वर्षानुवर्षे अतिक्रमणांकडे दुर्लक्ष करणाऱ्या पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांवर कधी कारवाई होणार ? – संपादक

पन्हाळा (जिल्हा कोल्हापूर), २८ सप्टेंबर (वार्ता.) – पन्हाळा येथील गड भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या कह्यात आहे. या गडावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून काही शासकीय अधिकार्यांनीच या भूमीवर अतिक्रमण केले आहे. तरी किल्ले पन्हाळा येथे पुरातत्व विभागाच्या कह्यात असलेल्या भूमीवर झालेल्या अतिक्रमणावर कारवाई करावी, तसेच गडावरील ऐतिहासिक वास्तू आणि मंदिर यांचा जिर्णाेद्धार करावा, या मागण्यांचे निवेदन हिंदु विधीज्ञ परिषदेच्या वतीने पन्हाळ्याचे तहसीलदार यांच्या नावे देण्यात आले. त्यांच्या अनुपस्थितीत निवासी नायब तहसीलदार विनय कौलवकर यांनी हे निवेदन स्वीकारले. या वेळी हिंदु विधीज्ञ परिषदेच्या वतीने अधिवक्त्या प्रीती पाटील, अधिवक्ता प्रकाश खोंद्रे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. बाबासाहेब भोपळे आणि श्री. शिवानंद स्वामी उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे की, पन्हाळा हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला, तसेच अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असणारा किल्ला आहे. या वास्तूकडे दुर्लक्ष होत असून गेल्या २ – ३ वर्षांपासून पावसाळ्यात रस्ते खचण्याचे प्रकार, अतिक्रमण आदींमुळे दुर्गप्रमी आणि शिवभक्त यांच्यामध्ये अप्रसन्नता आहे. त्यामुळे येथे अतिक्रमण करणार्यांवर योग्य ती कारवाई करून गडाचे पावित्र राखले जावे. पन्हाळा गडावर जाणार्या मार्गावर असणार्या नरवीर शिवा काशीद यांच्या समाधीस्थळाला पावसाच्या पाण्यामुळे धोका निर्माण झाला आहे. याविषयी योग्य ती कारवाई करावी.
खड्डे तक्रारीचे ‘पी.एम्.सी. रोड मित्र’ अॅप ४ महिन्यांपासून बंद !
कोस्टल रोडवरील बोगद्यात चारचाकीला आग; वाहने सोडून लोकांचे पलायन !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १६ .०७.२०२६)
एन्.एम्.एम्.टी.च्या इलेक्ट्रिक बसला आग
श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या जतन-संवर्धन कामात भारतीय पुरातत्वीय निकष आणि शास्त्रोक्त संवर्धन पद्धती यांचे काटेकोर पालन व्हावे ! – सकल हिंदु समाजाचे निवेदन
सोलापूर येथील वैष्णवी मंदिर परिसरातील महाकाय वटवृक्ष आगीपासून वाचला !