मुंबई – निलंबित वरिष्ठ साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना नजरकैदेत ठेवल्यास ते पळून जातील, अशी शक्यता राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने न्यायालयाकडे व्यक्त केली आहे. हृदयाचे शस्त्रकर्म झाल्यामुळे बरे होईपर्यंत त्यांच्या घरी नजरकैदेत ठेवण्याची मागणी वाझे यांनी विशेष न्यायालयाकडे केली आहे. याला राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने विरोध दर्शवला असून २७ सप्टेंबर या दिवशी न्यायालयाकडे त्यांनी वरील भूमिका मांडली आहे. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर ‘जिलेटिन’च्या कांड्या ठेवणे आणि त्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांची झालेली हत्या या प्रकरणांमध्ये सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे.