गोव्यात ‘हेली’ पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘ओल्ड गोवा’ येथे ५ कोटी खर्च करून बांधलेल्या हेलीपॅडचे उद्घाटन

प्रतिकात्मक छायाचित्र

पणजी, २० सप्टेंबर (वार्ता.) – गोव्यात ‘हेली’ पर्यटनाला (हेलिकॉप्टरद्वारे पर्यटन) प्रोत्साहन देण्यासाठी धावजी, ओल्ड गोवा या ठिकाणी हेलीपॅड बांधण्यात आले असून पर्यटन, संस्कृती आणि भारताच्या ईशान्य भागाचा विकास यासंबंधीच्या खात्याचे केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले.

डिसेंबर २०२१ पासून या हेलीपॅडवरून प्रतिदिन हेली सफर आणि संबंधित उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल. यामुळे गोव्यातील पर्यटनाला चालना मिळेल. या हेलीपॅडसाठी ४ सहस्र ५५० चौरस मीटर भूमीचे व्हीडीएफ् (व्हॅक्युम डिवॉटरींग काँक्रीट फ्लोरिंग) करण्यात आले असून ४९० मीटर लांबीची संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे. हेली पर्यटनाचे व्यवस्थापन करण्यासंबंधी निविदा मागवण्याची प्रक्रिया चालू करण्यात आली असून डिसेंबर २०२१ पासून हेली पर्यटन कार्यान्वित होईल, अशी माहिती पर्यटन खात्यातील एका अधिकार्‍याने दिली आहे. (हेलिपॅडचे उद्घाटन झाल्यानंतर हेली पर्यटनाचे व्यवस्थापन करण्यासंबंधी निविदा मागवणारे सुस्त पर्यटन खाते ! असा चालतो प्रशासनाचा कारभार ! – संपादक)