अलवर (राजस्थान) येथे धर्मांधांच्या जमावाच्या मारहाणीत दलित हिंदु तरुणाचा मृत्यू

  • हिंदूंना असहिष्णू ठरवून पुरस्कार परत करणारी लेखक, साहित्यिक, पत्रकार आदींची टोळी आता कुठे आहे ? काँग्रेसच्या राज्यात धर्मांधांकडून होणार्‍या हिंदूंच्या हत्यांविषयी आता समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, तृणमूल काँग्रेस आदी ढोंगी निधर्मीवादी राजकीय पक्ष कुठे आहेत ?
  • ‘दलित-मुस्लिम भाई भाई’ अशी घोषणा देणारे धर्मांध या प्रकरणाकडे सोयीस्कर कानाडोळा करतील, हे लक्षात घ्या !

अलवर (राजस्थान) – येथे धर्मांधांच्या जमावाने योगेश जाटव या दलित तरुणाची अमानुष मारहाण करून हत्या केली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या लोकांनी येथील अलवर-भरतपूर महामार्गावर योगेश यांचा मृतदेह ठेवून रस्ता बंद केला. योगेश यांच्या कुटुंबियांना ५० लाख रुपयांचे साहाय्य घोषित करावे, अशी राज्य सरकारकडे मागणीही या वेळी करण्यात आली. भाजपचे माजी आमदार ज्ञानदेव आहुजा यांनी योगेश यांच्या कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी देण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी या हत्येच्या प्रकरणी रशीद, साजेत पठाण, मुबीना आणि अन्य तिघांवर गुन्हा नोंदवला आहे.

योगेश यांना मारहाण झाल्याची घटना १५ सप्टेंबरला घडली होती. योगेश दुचाकीवरून जात असतांना एका महिलेला त्याच्या गाडीने धडक दिली. त्या वेळी जमावाने त्यांना पकडून मारहाण केली. यात तेे गंभीररित्या घायाळ झाले. अखेर १८ सप्टेंबरला त्यांचा मृत्यू झाला.

पोलीस अधिकारी इलियास आरोपींना वाचवत असल्याचे नातेवाइकांचा आरोप

पोलिसांनी या आरोपाची चौकशी करून सत्य जनतेला सांगावे ! – संपादक

नातेवाइकांनी आरोप केला आहे की, पोलीस ठाण्याचे अधिकारी इलियास आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे इलियास यांना निलंबित करून आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी.