सावर्डे ते चांदर रेल्वेमार्ग दुपदरीकरणाची २३ सप्टेंबर या दिवशी होणार चाचणी !

प्रतिकात्मक छायाचित्र

मडगाव, १९ सप्टेंबर (वार्ता.) – दक्षिण-पश्चिम रेल्वेच्या सावर्डे ते चांदर रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणाची चाचणी २३ सप्टेंबर या दिवशी होणार आहे. ही चाचणी घेतांना रेल्वेची मोटर ट्रॉली प्रतिघंटा १२० कि.मी. वेगाने धावणार आहे. ही चाचणी रेल्वे सुरक्षा आयुक्त्यांच्या वतीने घेण्यात येणार आहे. या रेल्वेमार्गाची लांबी १५. ६४ किलोमीटर एवढी आहे.

सध्या दक्षिण-पश्चिम रेल्वेच्या वतीने तिनईघाट ते वास्को रेल्वेस्थानकापर्यंत दुपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. स्थानिकांचा रेल्वेमार्ग दुपदरीकरणाला विरोध असला, तरी रेल्वे प्रशासनाच्या वतीने हे काम चालू ठेवण्यात आले आहे. सावर्डे ते चांदरपर्यंत मार्गाचे दुपदरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे.

२३ सप्टेंबर या दिवशी सकाळी १०.१५ वाजता सावर्डे येथून मोटर ट्रॉलीद्वारे चाचणीचे काम चालू केले जाणार आहे. सायंकाळी ५.१० वाजता मडगाव येथे तपासणीचे काम पूर्ण होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता सावर्डे ते कुडचडे मार्गाची चाचणी घेतली जाणार आहे. चाचणी मार्गावरून प्रतिघंटा १२० कि.मी. वेगाने मोटर ट्रॉली धावणार असल्याने या वेळी कुणीही रेल्वे रूळ ओलांडण्याचा प्रयत्न करू नये आणि या वेळी रेल्वे रूळ ओलांडणे धोकादायक ठरू शकते, असे दक्षिण-पश्चिम रेल्वे मंडळाने कळवले आहे.