आता छोटा बांगलादेशही भारताला डोळे वटारून दाखवत आहे. यातून भारताने आक्रमक परराष्ट्रनीती राबवणे किती आवश्यक आहे, हे स्पष्ट होते ! – संपादक
ढाका (बांगलादेश) – बंगालच्या उपसागरात सागरी सीमेविषयी भारतासमवेत चालू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशने संयुक्त राष्ट्रांत २ आव्हान याचिका प्रविष्ट केल्या आहेत. बंगालच्या उपसागरावर भारताचा हक्क आहे; मात्र त्यास बांगलादेश विरोध करत आहे.
बांगलादेशचे माजी परराष्ट्र सचिव शहीदुल हक यांनी सांगितले की, दोन्ही शेजारी देशांमध्ये सागरी सीमेचा वाद चालू आहे. आतापर्यंत दोन्ही देशांमध्ये अनेक चर्चा झाल्या; मात्र हा वाद अद्यापही कायम आहे. दोन्ही देश आता संयुक्त राष्ट्रांत गेले आहेत. जगातील सर्वांत मोठ्या मंचावरून हा वाद सोडवला जाईल, अशी अपेक्षा आहे. (संयुक्त राष्ट्रांमध्ये एखादी समस्या सुटत नाही, तर आणखी चिघळते. काश्मीरच्या सूत्रावरून भारताला याचा अनुभव आला आहे. त्यामुळे संयुक्त राष्ट्रे सागरी सीमेविषयी काही निर्णय देतील, अशी अपेक्षा नको ! – संपादक)