(म्हणे) ‘मंत्रीपद नाही, तर केवळ मुलांना जन्म देणे हेच महिलांचे काम !’ – तालिबान

  • भारतातील महिलांच्या संघटना, मानवाधिकार संघटना आदी तालिबानच्या विरोधात तोंड का उघडत नाहीत कि तालिबान करत आहे ते योग्यच आहे, असे त्यांना वाटते ? – संपादक
  • हिंदु धर्मामध्ये महिलांना देवीचे स्थान दिले आहे, तर तालिबान सांगत असलेल्या शरीयत कायद्यामध्ये महिला केवळ भोगवस्तू आणि मुले जन्माला घालणारे यंत्र समजले जाते, हे लक्षात घ्या ! याविषयी एकही पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी, तसेच फारूख अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती यांसारखे नेते बोलत नाहीत, हे लक्षात घ्या ! – संपादक
तालिबानचा प्रवक्ता

काबुल (अफगाणिस्तान) – एक महिला मंत्री होऊ शकत नाही. महिलेला मंत्री करणे म्हणजे एखाद्या व्यक्तीला न झेपणारे दायित्व देण्यासारखे आहे. मंत्रीमंडळामध्ये  महिलेचा समावेश असण्याची आवश्यकता नाही. महिलांनी केवळ मुलांना जन्म द्यावा, असे विधान तालिबानच्या प्रवक्त्याने येथील ‘टोलो न्यूज’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले आहे. यापूर्वी तालिबानने महिलांना समान अधिकार देण्याचे आश्‍वासन दिले होते. या प्रवक्त्याने ‘सध्या आंदोलन करत असलेल्या महिला संपूर्ण अफगाणिस्तानमधील महिलांचे प्रतिनिधित्व करत नसल्याचेही तालिबानी नेत्याने म्हटले.

मागील काही दिवसांपासून काबूलसह अन्य काही शहरांमध्ये तालिबान सरकारच्या विरोधात आंदोलन चालू आहेत. या आंदोलनात महिलांचाही समावेश लक्षणीय आहे. महिलांकडूनही समान अधिकार, शिक्षण-रोजगाराच्या अधिकारासाठी आंदोलने चालू आहेत.