मथुरेतील श्रीकृष्ण जन्मस्थळाभोवतीच्या १० चौरस कि.मी.चे परिघ ‘तीर्थक्षेत्र’ म्हणून घोषित !

मांस आणि मद्य यांच्या व्रिकीवर बंदी

मथुरा (उत्तरप्रदेश) – येथील श्रीकृष्णजन्मस्थळाच्या १० चौरस किलोमीटरच्या परिघाला उत्तरप्रदेश शासनाकडून ‘तीर्थक्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. या भागात २२ नगरपालिका प्रभाग क्षेत्रे आहेत. ती ‘तीर्थक्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आली आहेत. त्यामुळे या भागात आता मांस आणि मद्य यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.