७५ व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदी यांची पाक आणि चीन यांना चेतावणी !

संरक्षण क्षेत्रात भारत स्वावलंबी होत आहे. संरक्षण क्षेत्रात देशाला स्वावलंबी बनवण्यासाठी, भारतीय आस्थापनांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि आमच्या उद्योजकांना नवीन संधी देण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत.

(म्हणे) ‘१४ ऑगस्ट या दिवशी ‘फाळणी वेदना स्मृतीदिन’ म्हणून घोषित करून भारत धार्मिक द्वेष पसरवत आहे !’ – पाकचा आरोप

१४ ऑगस्ट पाकचा स्वातंत्र्यदिन असल्याने पाकला मिरच्या झोंबणारच; कारण हे स्वातंत्र्य १० लाख हिंदूंची हत्या आणि हिंदु महिलांवर बलत्कार करून त्याने मिळवले आहे आणि तेच भारताने दाखवण्याचा प्रयत्न केला आहे !

अविवाहित तरुणींनी केवळ मजा मारण्यासाठी शारीरिक संबंध ठेवण्यापर्यंत भारतीय समाज पोचलेला नाही ! – मध्यप्रदेश उच्च न्यायालय

भविष्यात अशी स्थिती येऊ नये; म्हणून शासनकर्त्यांनी समाजाला साधना शिकवून त्यांच्यामध्ये संयम आणि नैतिकता निर्माण केली पाहिजे !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘स्वातंत्र्यापासून आतापर्यंत एकही राजकीय पक्षाने जनतेला माणुसकी शिकवली नाही. परिणामी देश सर्वच बाबतीत परिसीमेच्या अधोगतीला पोचला आहे.’

महाराष्ट्रातील मुख्य शहरांमध्ये ‘उर्दू घरे’ उभारण्याचा सरकारचा निर्णय !

महाराष्ट्रात मराठी भाषेच्या सबलीकरणावर भर देण्यापेक्षा उर्दूचे इतके उदात्तीकरण कशासाठी ?

…अखेर काश्मीर येथील लालचौकातील घंटाघर तिरंगा रंगात न्हाऊन निघाले !

५ ऑगस्ट २०१९ हा सोन्याचा दिवस उगवला. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी आणि  गृहमंत्री श्री. अमित शहा यांनी स्वत:च्या राजकीय इच्छाशक्तीच्या बळावर भारतापासून काश्मीरला वेगळे करणारी ‘३७० अन् ३५ अ’ ही विषवल्ली मुळासकट उपटून टाकली.

पुन्हा एकदा भारतमातेच्या मस्तकावर हिंदु राष्ट्राचा मुकुट चढवण्याचा निश्चय करूया ! – हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्या अंतर्गत स्वरक्षण प्रशिक्षण उपक्रमाच्या माध्यमातून १ ते १४ ऑगस्ट कालावधीत ‘ऑनलाईन स्वातंत्र्यगाथा शौर्यजागृती व्याख्यान’ शौर्य आणि राष्ट्रभक्तीपूर्ण वातावरणात पार पडले !

सरकारी घर न सोडणार्‍या अधिकार्‍यांकडून भाड्यासह दंड वसूल करण्यात येणार !

सेवानिवृत्त किंवा स्थानांतर होऊनही मुंबईतील सरकारी निवासस्थाने न सोडणार्‍या अधिकार्‍यांकडून निवासस्थानाच्या भाड्यासह दंड वसूल करण्याचा आदेश शासनाने काढला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या स्वीय साहाय्यकांना ईडीकडूनच्या चौकशीची धमकी !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय साहाय्यक मिलिंद नार्वेकर यांना एका अज्ञात व्यक्तीने ‘व्हॉट्सॲप’ संदेशाद्वारे ‘तुमची अंमलबजावणी संचालनालयाद्वारे (ईडी) चौकशी करायला लावू’, अशी धमकी दिली.