परात्पर गुरु डॉक्टरांचे ‘श्रीसत्यनारायण रूप’ पाहून ते ‘गोविंद’ रूपातच असल्याचे अनुभवणे आणि कृतज्ञताभाव जागृत होणे

डोळे मिटून प्रार्थना करतांना ‘या वेळी परात्पर गुरु डॉक्टर ‘गोविंद’ रूपात दर्शन देतील’, असे वाटणे आणि डोळे उघडताच गुरुदेवांना श्रीसत्यनारायणाच्या रूपात पाहणे व कृतज्ञताभाव जागृत होणे.

पू. रमानंद गौडा यांच्या पायाखाली ठेवलेले आसन साधिकेने जवळ घेतल्यावर ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा स्पर्श’ झाल्याचे वाटून येणे

संतांच्या माध्यमातून साधनेचे सातत्याने प्रयत्न करवून घेणार्‍या आणि संतांच्या रूपातून गुरूंच्या अस्तित्वाची अनुभूती देणार्‍या परात्पर गुरु डॉ. आठवले.

५७ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला चि. अनंत अमित देखणे (वय १ वर्ष) !

चि. अनंतच्या जन्मापूर्वी अन् गरोदरपणात जाणवलेली सूत्रे, तसेच चि. अनंतच्या जन्मानंतर आई आणि वडिलांना लक्षात आलेली त्याची गुणवैशिष्ट्ये.

‘वाईट शक्ती चांगल्या कार्यात कसे विघ्न आणतात’, हे देवाने साधिकेला दृश्यरूपात दाखवणे

सूक्ष्मातून गुरुदेवांना आढावा देतांना दिसलेल्या दृश्यात आश्रमातील यज्ञकुंडाजवळ उभे असलेल्या सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाकांच्या दिशेने एका व्यक्तीने रागाने दगड मारणे, सद्गुरु गाडगीळकाकांनी जागेवरूनच अंग वळवल्याने त्यांना दगड न लागणे

गोव्यातून पुण्यात आलेला विदेशी मद्याचा साठा जप्त !

महाराष्ट्रात गोवा राज्यातील मद्यविक्रीस प्रतिबंध आहे. तरीही अवैधरित्या मद्याची वाहतूक करण्यात आल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी एकनाथ लोके याला मुंबई दारूबंदी कायद्यानुसार अटक करण्यात आली आहे.

कोल्हापूर जिल्हा आणि शहर युवासेनेच्या वतीने पूरग्रस्त महिलांना साडीसह जीवनावश्यक वस्तूंचे वाटप !

या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, शहर प्रमुख शिवाजीराव जाधव, शुभांगी पवार, स्मिता सावंत, वैभव जाधव, पूनम पाटील, मंगेश चितारे, चैतन्य देशपांडे यांसह अन्य उपस्थित होते. 

हेटी देशातील भूकंपामध्ये ३०४ जणांचा मृत्यू

भूकंपामुळे ८६० घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली, तर ७०० घरांची हानी झाली आहे. अमेरिका, चिली आदी देशांनी या संकटकाळात हेटीला साहाय्य करण्याचे घोषित केले आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये ठार करण्यात आलेला आतंकवादी बुरहान वानी याच्या वडिलांनी केले ध्वजारोहण !

आतंकवाद्यांच्या वडिलांनी ध्वजारोहण करण्याच्या वृत्ताला नाहक प्रसिद्धी देणारी प्रसारमाध्यमे हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या कुटुंबियांनी ध्वजारोहण केल्याचे वृत्त का दाखवत नाहीत ?

तालिबानसमोर अफगाणिस्तान सरकारची शरणागती !

तालिबानमधील दुसर्‍या क्रमांकाचा नेता मुल्ला बरादर हा राष्ट्रपती अशरफ गनी यांच्यासमवेत चर्चा करत आहे. या चर्चेनंतर अली अहमद जलाली याच्याकडे राष्ट्रपती गनी सत्ता सोपवणार असल्याचे म्हटले जात आहे.

जोपर्यंत चीनवर आपण अवलंबून रहाणार, तोपर्यंत त्याच्यासमोर झुकावे लागेल ! – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

केंद्रातील भाजप सरकारने सरसंघचालकांच्या या विधानाकडे गांभीर्याने लक्ष देऊन भारताला स्वावलंबी बनवण्यासाठी प्रयत्न करावा, असेच जनतेला वाटते !