-
हिंदु जनजागृती समितीच्या अंतर्गत स्वरक्षण प्रशिक्षण उपक्रमाच्या माध्यमातून १ ते १४ ऑगस्ट कालावधीत ‘ऑनलाईन स्वातंत्र्यगाथा शौर्यजागृती व्याख्यान’ शौर्य आणि राष्ट्रभक्तीपूर्ण वातावरणात पार पडले !
-
१०० हून अधिक व्याख्यानांच्या माध्यमातून हिंदु जागृतीचा आविष्कार !
मुंबई – भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतीपुत्रांनी स्वत:च्या प्राणांची आहुती दिली, घरादारावर तुळशीपत्र ठेऊन या मातृभूमीसाठी शौर्य गाजवले; पण आजची स्थिती आम्ही बघितली, तर ज्या राष्ट्रपुरुषांनी वा क्रांतीकारकांनी या भारतमातेसाठी सर्वस्व दिले, त्यांचा शौर्यशाली इतिहास शिकवला जात नाही. गेल्या ७४ वर्षांमध्ये आम्हाला योग्य शौर्यशाली इतिहास न शिकवल्यामुळे आज पुन्हा एकदा भारतमातेचे लचके तोडले जात आहेत. हिंदूंमधील युगानुयुगे रक्तात असलेले शौर्य जागृत करण्याची वेळ आता आली आहे. भारतमातेला पुन्हा एकदा वैभव प्राप्त करून देण्ो आवश्यक आहे. आजचा युवक विदेशी आकर्षणाला बळी पडला आहे. त्यामुळे आपण सर्वांनी पुन्हा एकदा भारतमातेचे स्वरूप देऊन तिच्या मस्तकावर हिंदु राष्ट्राचा मुकुट चढवण्याचा निश्चय करूया, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या अंतर्गत स्वरक्षण प्रशिक्षण उपक्रमाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या ‘ऑनलाईन स्वातंत्र्यगाथा शौर्यजागृती व्याख्याना’मध्ये करण्यात आले. १ ते १४ आगॅस्ट या कालावधीत स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने क्रांतीपुत्रांना विनम्र अभिवादन करण्यासाठी वरील व्याख्यानांचे आयोजन मोठ्या प्रमाणावर करण्यात आले. भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने १०० हून अधिक व्याख्यानांच्या माध्यमातून हिंदु युवकांमध्ये राष्ट्रभक्तीचे बीज रोवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या व्याख्यानांचा महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक येथील १ सहस्र ७०० हून अधिक जणांनी लाभ घेतला.
क्षणचित्रे
१. व्याख्यानातून प्रेरणा घेऊन अनेक युवकांनी स्वरक्षण प्रशिक्षण वर्गामध्ये आणि राष्ट्र अन् धर्म यांच्या कार्यात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली.
२. अनेकांनी ‘अशा प्रकारची जागृती अखंड झाली पाहिजे. ही काळानुसार आवश्यकता आहे’, असे अभिप्राय कळवले.
३. या संपूर्ण व्याख्यानाच्या नियोजनांमध्ये स्वरक्षण प्रशिक्षण उपक्रमातील सर्व धर्मप्रेमींनी उत्साहाने आणि तळमळीने सेवा केली.