१४ ऑगस्ट पाकचा स्वातंत्र्यदिन असल्याने पाकला मिरच्या झोंबणारच; कारण हे स्वातंत्र्य १० लाख हिंदूंची हत्या आणि हिंदु महिलांवर बलत्कार करून त्याने मिळवले आहे आणि तेच भारताने दाखवण्याचा प्रयत्न केला आहे !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ ऑगस्ट हा दिवस ‘फाळणी वेदना स्मृतीदिन’ (विभाजन विभीषिका स्मृति दिवस) म्हणून ओळखला जाईल, असे घोषित केले. त्यावर पाकन, ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप सरकार निवडणुकीत लाभ मिळण्यासाठी धार्मिक द्वेष पसरवत आहे.’ (हिंदूंच्या हत्या करणे, हिंदूंच्या मुलींचे अपहरण करून त्यांचे बळजोरीने धर्मांतर करणे आदी गोष्टी करून कोण धार्मिक द्वेष पसरवत आहेत, हे जग जाणून आहे ! – संपादक)
पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाने ट्वीट करून लिहिले की, हिंदुत्व विचारसरणीचे अनुयायी द्वेष आणि हिंसाचार यांचे समर्थक आहेत. इतिहासाची मोडतोड करून धार्मिक द्वेष पसरवणे संघ आणि भाजप यांचे वैशिष्ट्य आहे. जुन्या जखमा भरण्याऐवजी निवडणुकीत लाभ मिळवण्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. आम्हाला विश्वास आहे की, भारताचे सद्भावना असलेले लोक या राजकीय प्रयत्नाला पूर्णपणे नाकारतील.
काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, प्रदेशाध्यक्ष, भाजप, मुंबई
काश्मीरमध्ये जिहादी आतंकवादी आणि भारतीय सैनिक यांच्यात चकमक : एका सैनिकाला वीरमरण
नेपाळच्या एक रुपयाच्या नाण्यावरून भारताचे भाग दाखवण्यात आलेला नकाशा हटणार नाही !
परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर व्यक्त केली चिंता !
अमेरिकेत भारतविरोधी खलिस्तान्यांना हात लावणे ठरणार गुन्हा !
Sanctions On Afghanistan : अफगाणिस्तानवरील संयुक्त राष्ट्रांच्या सध्याच्या निर्बंध व्यवस्थेवर पुनर्विचार करणे आवश्यक !