मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय साहाय्यक मिलिंद नार्वेकर यांना एका अज्ञात व्यक्तीने ‘व्हॉट्सॲप’ संदेशाद्वारे ‘तुमची अंमलबजावणी संचालनालयाद्वारे (ईडी) चौकशी करायला लावू’, अशी धमकी दिली आहे. या प्रकरणी नार्वेकर यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडे तक्रार प्रविष्ट केली आहे.
मिलिंद नार्वेकर यांना एका अज्ञात व्यक्तीने व्हॉट्सॲप संदेश पाठवून आपल्या काही मागण्या पूर्ण करण्यास सांगितले. या मागण्या पूर्ण न केल्यास तुमची ईडी, एन्आयए आणि सीबीआय यांच्याद्वारे चौकशी करायला लावू, अशी धमकी संदेशामध्ये दिली आहे. मागण्यांविषयी नेमकेपणाने माहिती मिळाली नाही.