आपत्काळात तातडीच्या बचावकार्यासाठी कोकणात राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक नियुक्त करावे ! – कु. अदिती तटकरे, राज्य उद्योगमंत्री

रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या ठिकाणी मागील ५ वर्षांत ३ वेळा चक्रीवादळ आले होते. २-३ वेळा पूर आला होता. अशा वेळी स्थानिक पातळीवरील पथकांना बचावकार्य करण्यास अडचण येते.

ढगफुटीसदृश पावसामुळे राज्यातील पाण्याची चिंता मिटली !

८ दिवसांपूर्वी सर्व धरणांमध्ये सरासरी ३२ टक्के पाणीसाठा होता; मात्र एका आठवड्यात झालेल्या अतीवृष्टीमुळे १६ टक्के पाणीसाठा वाढून तो ४८ टक्क्यांवर पोचला आहे.

आमदार प्रताप सरनाईक यांच्याविरुद्ध कोणतीही कठोर कारवाई करू नका ! – उच्च न्यायालयाचा ‘ईडी’ला आदेश

‘एन्.एस्.ई.एल्.’ आणि ‘टॉप सिक्युरिटी’ प्रकरणी २८ जुलै या दिवशी सुनावणी होणे अपेक्षित होते; परंतु न्यायालय सध्या परमबीर सिंह आणि रश्मी शुक्ला यांच्या याचिकांवर सुनावणी घेत आहे.

सामाजिक माध्यमांतून विचारले जाताहेत प्रश्न !

‘चिपळूणच्या या परिस्थितीला निसर्ग उत्तरदायी आहे’, असे म्हणून चालणार नाही. संबंधित शासनयंत्रणेला खडसवायला हवे.

कलादिग्दर्शक राजेश साप्ते यांच्या आत्महत्या प्रकरणी तिसर्‍या आरोपीस अटक !

धर्मेंद्र रावत यांना पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने ३० जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी या आधी चंदन ठाकरे यांना, तर साप्ते यांना धमकावणार्‍या राकेश मौर्य यांना अटक केली.

‘टिळक महाराष्ट्र विद्यापिठा’च्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सनातनची युवासाधिका कु. आर्या श्रीश्रीमाळ हिचा तृतीय क्रमांक !

या स्पर्धेत महाराष्ट्रातील १०० शाळांमधून ५०० विद्यार्थी सहभागी झाले होते. कु. आर्या हिची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के असून ती पुणे येथील अहिल्यादेवी हायस्कूलमध्ये इयत्ता १० वीत शिकत आहे.

कोकणातील आपत्तीग्रस्तांना साहाय्यासाठी एक मासाचे वेतन देणार ! – राधाकृष्ण विखे- पाटील, आमदार, भाजप

कोकणातील अतीवृष्टीग्रस्तांच्या साहाय्यासाठी स्वत:चे १ मासाचे वेतन देणार असल्याचे भाजपचे शिर्डीचे आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले. विखेंनी मतदारसंघात साहाय्य संकलित करण्यासही प्रारंभ केला आहे.

पूर ओसरल्यानंतर पूरग्रस्तांना आता सरपटणारे प्राणी आणि रोगराई यांची भीती !

पावसाचा जोर अल्प झाल्याने राज्यातील ग्रामीण भागात आलेला पूर ओसरला आहे; मात्र आता पूरग्रस्तांसमोर अन्य अनेक समस्या उभ्या आहेत. घरादारांतील चिखल काढत असतांना पूरग्रस्तांसमोर आता पुराच्या पाण्यासमवेत….

आपत्काळात राजकारण नको !

कोल्हापूरला आलेल्या महापुरात पूरग्रस्तांना अनेक लोकप्रतिनिधींनी साहाय्य पाठवले आहे. यातून सर्वच पक्षांतील लोकप्रतिनिधींनी बोध घेऊन, तसेच राजकारण थांबवून लोकांना साहाय्य करणे, हे त्यांचे कर्तव्य आहे.

शहापूर (जिल्हा ठाणे) येथील भूमी अभिलेख कार्यालयातील लाचखोर लिपीक अटकेत !

तक्रारदाराच्या जमिनीच्या मोजणीमध्ये आलेल्या ३ गुंठे फरकाचा पंचनामा करून देण्यासाठी ५ सहस्र रुपयांच्या लाचेची मागणी शहापूर येथील भूमी अभिलेख उपअधीक्षक यांच्या कार्यालयातील लिपीक पंडित गोखणे यांनी केली होती.