ठाणे, २८ जुलै (वार्ता.) – तक्रारदाराच्या जमिनीच्या मोजणीमध्ये आलेल्या ३ गुंठे फरकाचा पंचनामा करून देण्यासाठी ५ सहस्र रुपयांच्या लाचेची मागणी शहापूर येथील भूमी अभिलेख उपअधीक्षक यांच्या कार्यालयातील लिपीक पंडित गोखणे यांनी केली होती. तडजोडीअंती ठरलेली २ सहस्र रुपयांची लाचेची रक्कम घेतांना गोखणे यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली. त्यांना २९ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. (अशा लाचखोरांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांच्यावर कठोर कारवाई करायला हवी ! – संपादक)