पुणे – लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त टिळक महाराष्ट्र विद्यापिठाने (‘टिमवि’ने) मराठी, हिंदी, संस्कृत आणि इंग्रजी या भाषांमध्ये महाराष्ट्रस्तरीय ‘ऑनलाईन’ वक्तृत्त्व स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत सनातन संस्थेची युवासाधिका कु. आर्या महावीर श्रीश्रीमाळ हिने ‘लोकमान्य टिळक – ॲन आऊटस्टॅण्डींग पर्सनॅलिटी’ (लोकमान्य टिळक – एक अलौकिक व्यक्तिमत्त्व) हा विषय इंग्रजी भाषेत ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातून मांडला होता. या स्पर्धेत तिला तृतीय क्रमांक प्राप्त झाला आहे.
या स्पर्धेत महाराष्ट्रातील १०० शाळांमधून ५०० विद्यार्थी सहभागी झाले होते. कु. आर्या हिची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के असून ती पुणे येथील अहिल्यादेवी हायस्कूलमध्ये इयत्ता १० वीत शिकत आहे.