हुपरी (जिल्हा कोल्हापूर) – छत्रपती संभाजीनगर येथे २३ सप्टेंबर या दिवशी इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखालील ‘तिरंगा रॅलीत’ संभाजीनगर-जालना रस्त्यात असलेल्या नामर्निदेशक ‘संभाजीनगर’ फलकावर काळे फासणार्यांवर गुन्हे नोंदवावेत, या मागणीचे निवेदन सकल हिंदु समाजाच्या वतीने हुपरी येथील पोलीस ठाण्यात देण्यात आले. हे निवेदन साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसाद कोळपे यांनी स्वीकारले. या प्रसंगी सर्वश्री नितीन काकडे, सागर मेथे, युवराज खराडे, महादेव आढावकर, निळकंठ माने, शुभम पाटील, प्रवीण पाटील, अजित माळी यांसह अन्य उपस्थित होते.