३ ऑगस्ट या दिवशी विधीमंडळ सदस्यांसाठी होणार ध्यानयोग शिबिर !
विधीमंडळातील सदस्यांकरिता ३ ऑगस्ट या दिवशी सकाळी विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात ‘समर्पण ध्यानयोग’ या एक दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
विधीमंडळातील सदस्यांकरिता ३ ऑगस्ट या दिवशी सकाळी विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात ‘समर्पण ध्यानयोग’ या एक दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हिंदुद्वेषी द्रमुक सत्तेवर असलेल्या राज्यात हिंदूंची धार्मिक स्थळे धोक्यात येणे, यात आश्चर्य ते काय ?
शालेय पोषण आहारात ‘प्लास्टिकयुक्त’ तांदुळाचे मिश्रण असण्याची शक्यता आहे, अशी तक्रार एका पालकाने केली आहे.
एबेल २०६५ या नावाने ओळखल्या जाणार्या आकाशगंगा समूहातील एका रेडिओ आकाशगंगेच्या अवशेषांचा शोध भारतीय शास्त्रज्ञांना लागला आहे. हे संशोधन अॅस्ट्रोफिजिकल जर्नलच्या १६ जुलैच्या अंकात प्रकाशित करण्यात आले आहे.
दळणवळण बंदीमध्ये बंदोबस्तासाठी पोलिसांना होमगार्डचे (गृहरक्षक दलात कार्यरत असलेले) मोठ्या प्रमाणात साहाय्य झाले. या काळात दिवस-रात्र बंदोबस्ताला असूनही ४२ सहस्र होमगार्डना एप्रिल ते जुलै या ४ मासांचे मानधन देण्यात आलेले नाही.
शहरातील अंतर्गत रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि अस्वच्छता यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले, तसेच महापालिकेच्या प्रवेशद्धाराची तोडफोडही केली.
समस्या सोडवणे आणि विकासकामांना गती देणे यांसाठी सभा आयोजित केली जाते. याचे जराही भान न ठेवता वाद घालणार्या नगरसेवकांवर कठोर कारवाई केली पाहिजे. त्याविना असे प्रकार थांबणार नाहीत !
चालू शैक्षणिक वर्षात पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील खासगी शाळांनी शैक्षणिक शुल्कात २५ टक्क्यांनी कपात करावी या ठरावाला पुणे जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत एकमताने सहमती मिळाली.
तळीये (महाड) येथे अतीवृष्टीमध्ये झालेल्या भूस्खलनामध्ये ३५ घरे मातीखाली गाडली गेली होती. या घरांच्या पुनर्वसनासाठी जागा निश्चित करण्यात आली आहे, अशी माहिती तळीये गावचे कोतवाल बाळा कोंढाळकर यांनी दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘स्वयंपूर्ण गोवा’ योजनेच्या अंतर्गत पंचसदस्यांना ‘ऑनलाईन’ पद्धतीने मार्गदर्शन करणार