|
तिरुनेलवेली (तमिळनाडू) – येथील मंदिरे असलेल्या पवित्र डोंगरावर धर्मांधांनी चांदतारा काढला आणि ‘७८६’ (इस्लाममधील पवित्र आकडा. या आकड्याचे स्मरण केल्यास कार्यामध्ये यश मिळते, अशी संबंधित पंथियांची श्रद्धा आहे.) हा आकडा, तसेच ‘अल्लाह’ शब्द लिहिल्याचे उघडकीस आले आहे. यानंतर येथील हिंदूंनी संताप व्यक्त करत ‘राज्याच्या धर्मादाय विभागाने यावर त्वरित कारवाई करावी, तसेच डोंगर आणि मंदिर यांचे रक्षण करावे’, अशी मागणी केली आहे. हिंदूंना भीती आहे की, धर्मांध या पवित्र डोंगरावरील मंदिरांच्या परिसरात अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करत आहेत.
तमिळनाडूमध्ये हिंदु धर्मावर अलीकडे झालेले आघात जाणा !मागील काही कालावधीपासून तमिळनाडूमध्ये हिंदु धर्मावर होणार्या आघातांचे प्रमाण वाढले आहे. १. मागील मासात समाजकंटकांनी राज्यातील पंचलिंगेश्वर मंदिरातील अम्मनदेवी आणि दुर्गादेवी यांच्या मूर्तींची नासधूस केली. २. कडायम येथे चर्चने हिंदूंच्या जागेवर केलेल्या अतिक्रमणाच्या विरोधात आवाज उठवणार्या हिंदूंनाच पोलिसांकडून दमदाटी ! द्रमुकच्या राज्यात तमिळनाडूमधील हिंदूंवर होणारे अत्याचार वाढत असून ते थांबवण्यासाठी हिंदूसंघटन अपरिहार्य आहे, हे जाणा ! |