शालेय पोषण आहारात ‘प्लास्टिक’चे तांदूळ असल्याचे सिद्ध झाल्यास आहार देणार्या दोषी ठेकेदारांवर प्रशासनाने कठोर कारवाई करावी !
नांदेड – शालेय पोषण आहारात ‘प्लास्टिकयुक्त’ तांदुळाचे मिश्रण असण्याची शक्यता आहे, अशी तक्रार एका पालकाने केली आहे. जिल्ह्यातील आदिवासीबहुल असलेल्या किनवट तालुक्यातील कोसमेट गावात हा प्रकार घडला. यानंतर पंचायत समितीच्या पथकाने शाळेत येऊन तांदुळाचे नमुने घेऊन ते पडताळणीसाठी पाठवले आहेत.
जिल्हा परिषदेचे सदस्य सूर्यकांत आरंडकर यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांना निवेदन देऊन या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. मुंबई येथील ‘स्टेट को ऑपरेटिव्ह कंझ्युमर फेडरेशन’द्वारे पोषण आहाराचे वाटप होत असते. याविषयी त्यांनी अद्याप कोणताही खुलासा केलेला नाही.