इस्कॉनच्या वतीने १९ ते २१ जून ऑनलाईन नॅशनल युथ फेस्टीव्हल !

  • २५ लाख युवकांचा विश्‍वविक्रमी सहभाग 

  • फेस्टीव्हलसाठी  विनामूल्य नोंदणी

इस्कॉनच्या वतीने भारतव्यापी युथ फेस्टीव्हल

नगर – इस्कॉनच्या वतीने इंटरनॅशनल योगा डेनिमित्त १९ ते २१ जून या कालावधीत भारतव्यापी युथ फेस्टीव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. या फेस्टीव्हलमध्ये भारतातून २५ लाख युवक सहभागी होणार असून युवकांना या फेस्टीव्हलमध्ये सहभागी होण्याकरिता विनामूल्य नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. युवकांचा विश्‍वविक्रमी सहभाग असणारा हा फेस्टीव्हल इस्कॉनचे कार्य युवापिढीत रूजवण्यास उपयुक्त ठरणार आहे, असे नगर शहरातील इस्कॉन मंदिराचे व्यवस्थापक श्री. गिरीवरधारी दास यांनी सांगितले.

श्री. गिरीवरधारी दास म्हणाले, हा नॅशनल मेगा युथ फेस्टीव्हल इन्स्पायरो २०२१ या नावाने साजरा होणार आहे. श्रीमद्भगवद्गीता आजच्या संगणक युगातही कुटुंबव्यवस्था, शिक्षण, उद्योग अशा सर्व जीवनोपयोगी क्षेत्रात कशी उपयुक्त आहे ? हे या फेस्टीव्हल मधील वक्त्यांच्या मार्गदर्शनामधून स्पष्ट होईल. भारतीय संस्कृतीमध्ये भक्तीला विज्ञानाचा कसा आधार आहे ? हे वक्ते आपल्या व्याख्यानामधून सांगतील.

१९ जून या दिवशी सायंकाळी ७ ते रात्री ८.३० या वेळेत मेंबर ऑफ फोर्ट चॅरिटीजचे श्री. अल्फ्रेड बी फोर्ड यांचे इस्ट मिट्स वेस्ट या विषयावर इंग्रजीमधून व्याख्यान होईल. २० जून या दिवशी दुपारी १२ ते २ या वेळेत फाऊंडर अँड सीईओ, बडा बिझनेसचे डॉ. विवेक बिंद्रा यांचे बिझनेस योगा फ्रॉम श्रीमद्भगवद्गीता या विषयावर हिंदीमधून व्याख्यान होईल. २१ जून या दिवशी सायंकाळी ७ ते रात्री ८.३० या वेळेत व्हाईस क्लबचे डायरेक्टर आणि भक्ती योगा टिचर श्री. राधेशामजी दास (एम्.टेक.,आय.आय.टी., मुंबई) यांचे डिस्कव्हर युवरसेल्फ या विषयावर इंग्रजीमधून व्याख्यान होईल.

इस्कॉनच्या या ऑनलाईन फेस्टीव्हलमध्ये सहभागी झालेल्या युवकांमध्ये ऑनलाईन स्पर्धा घेण्यात येऊन विविध आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत.  युवकांनी www.giversclub.in या संकेतस्थळावर विनामूल्य नोंदणी करून या नॅशनल मेगा युथ फेस्टीव्हलचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. गिरीवरधारी दास यांनी केले आहे.