पुणे येथे अमली पदार्थांची विक्री करणार्‍या नायजेरियाच्या तरुणाला अटक !

अमली पदार्थांची मोठ्या प्रमाणात तस्करी करणार्‍या नायजेरियाच्या तरुणांना सरकारने देशाबाहेर हाकलून द्यायला हवे, असेच नागरिकांना वाटते !

पुणे – येथील उंड्री वडाचीवाडी परिसरात रहाणार्‍या ओलमाईड कायोदे या नायजेरियाच्या तरुणाला कोकेनच्या विक्रीप्रकरणी अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून ५ लाख ३० सहस्र रुपयांचे ५३ ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले आहे. त्याच्याविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.