पाकच्या ग्वादर बंदरामधील समुद्रात चिनी नौकांकडून होणार्‍या मासेमारीचा पाकिस्तानी मच्छीमारांकडून विरोध

पाक सरकारचे विरोधाकडे दुर्लक्ष !

चीनच्या कर्जाखाली दबलेल्या पाकमध्ये चीनला विरोध करण्याची शक्तीच राहिलेली नसल्याने उद्या संपूर्ण पाकच चीनच्या नियंत्रणात गेल्यास आश्‍चर्य वाटू नये !

प्रतिकात्मक छायाचित्र

कराची (पाकिस्तान) – पाकने बलुचिस्तानमधील ग्वादर बंदर विकसित करण्यास दिले आहे. आता येथील समुद्रात चिनी नौका मोठ्या प्रमाणात मासेमारी करत असल्याने स्थानिक पाकिस्तानी मच्छीमारांनी याला विरोध केला आहे; मात्र पाक सरकार त्यांच्या विरोधाकडे दुर्लक्ष करत आहे. चीनमध्ये जगातील एक तृतीयांश मासे खाल्ले जातात. सध्या चीनच्या समुद्रातील मासे नष्ट होत आहेत. त्यामुळे चीन जगातील मासेमारीवर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात आहे.

चिनी नौकांच्या मासेमारीच्या विरोधात ‘द नॅशनल पार्टी’ आणि ‘बलोच स्टुडंट ऑर्गनायझेशन’ यांनी मोर्चा काढत धरणे आंदोलन केले होते. स्थानिक मच्छीमारांचे म्हणणे आहे की, ग्वादर बंदर बांधण्याचे काम चालू झाल्यामुळे आम्ही तेथे मासेमारी करणे थांबवले होते; मात्र आता पाक सरकारने चिनी मच्छीमारांना मासेमारीसाठी परवाने दिले आहेत. त्यामुळे आमच्या पोटापाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. स्थानिक सरकार आणि केंद्र सरकार चीनची बाजू घेत आहेत.