‘लव्ह जिहाद’, ‘भूमी जिहाद’ यानंतर आता नव्याने अस्तित्वात येणारा ‘पॅनकार्ड जिहाद’ !
मुंबई भाजपच्या उपाध्यक्षांच्या तक्रारीनंतर चौकशीचे गृहमंत्र्यांचे आदेश
मुंबई – मालाडमधील मालवणी येथील मुसलमानबहुल भागात रहाणार्यांकडे २ किंवा त्याहून अधिक पॅनकार्ड आहेत. अशा प्रकारे नियोजनबद्ध पद्धतीने सहस्रो लोकांनी बनावट पॅनकार्ड बनवून घेतल्याचा आरोप होत आहे. याविषयी मुंबई भाजपचे उपाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचा आदेश मुंबई पोलीस आयुक्तांना दिला आहे, तसेच केंद्रीय अन्वेषण यंत्रणांनाही या प्रकरणाची माहिती देण्यास सांगितले आहे.
मालवणी येथील आशीर्वाद इमारतीत रहाणार्या कमरुनिसा अब्दुल अजीज खलिफा यांच्याकडे २ पॅनकार्ड आहेत. याविषयी विचारल्यावर त्यांनी सांगितले, ‘‘जुन्या पॅनकार्डमधील नावातील चूक सुधारण्यासाठी दुसरे पॅनकार्ड बनवले.’’ पण असे करतांना पॅनकार्ड क्रमांकही पालटण्यात आला आहे.
मालवणी परिसरात लोक बनावट पॅनकार्डप्रमाणेच बनावट आधारकार्ड, मतदानकार्ड, शिधापत्रिका, तसेच ‘आयुष्यमान भारत’ योजनेचेही कार्ड मोठ्या प्रमाणावर बनवत असल्याचा आरोप केला जात आहे.
संपादकीय भूमिका :
|