पुणे – गणेशोेत्सवाच्या काळामध्ये अन्न आणि औषध प्रशासनाने (एफ्.डी.ए.) पुणे जिल्हा आणि विभागांत भेसळयुक्त अन्नपदार्थांची विक्री करणार्यांवर कारवाई करत १४ लाख ३८ सहस्र रुपयांचा साठा हस्तगत केला आहे. पुणे जिल्ह्यातील ४७ अन्न आस्थापनांकडून दूध, खवा, पनीर, स्वीट मावा, तूप, बटर आणि तिखटमिठाच्या पदार्थांचे ५३ नमुने, तर शहरातील १०१ आस्थापनांतून ११७ नमुने पडताळणीसाठी घेतले होते. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. जिल्ह्यातून ५ लाख १९ सहस्र ४३८ रुपयांचा, तर शहरातून ९ लाख १९ सहस्र ५२० रुपयांचे भेसळयुक्त अन्नपदार्थ हस्तगत करण्यात आले.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > स्थानिक बातम्या > पुणे जिल्ह्यातून १४ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नपदार्थांचा साठा हस्तगत !
पुणे जिल्ह्यातून १४ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नपदार्थांचा साठा हस्तगत !
नूतन लेख
- शिक्षिका श्रीमती अश्विनी दयानंद स्वामी ‘शिक्षक गौरव’ पुरस्कार देऊन सन्मानित !
- विद्यार्थ्यांच्या नव्या गणवेशाला अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनेचा विरोध
- पुणे येथे महिलेच्या विनयभंगाच्या प्रकरणी शाळेच्या प्रशासकावर गुन्हा नोंद !
- कुटुंब व्यवस्था ढासळल्यामुळे भारतीय संस्कृतीचा र्हास ! – महेंद्र महाजन, मुख्य न्यायाधीश, पुणे जिल्हा सत्र न्यायालय
- मोकाट कुत्र्यांमुळे महापालिका आयुक्तांच्या वाहनाला अपघात
- पिंपरी-चिंचवड येथे संघाचा ६ ऑक्टोबरला विजयादशमी उत्सव !