मुंबई महापालिका प्रत्येक वार्डच्या बाहेर लसीकरण केंद्रांची माहिती देणार ! – महापौर

किशोरी पेडणेकर

मुंबई – महापालिकेच्या प्रत्येक वार्डच्या बाहेर कोरोनाच्या लसीकरण केंद्रांची माहिती उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.

किशोरी पेडणेकर पुढे म्हणाल्या की,४५ वर्षांपुढील व्यक्ती आणि पहिल्या फळीतील कोविड योद्धे थेट लसीकरण केंद्रात जाऊन लसीचा दुसरा डोस घेऊ शकतात. अशी ५९ केंद्रे असून त्याची प्रत्येक वार्डला माहिती दिली जाणार आहे. वॉर रुममध्येही चालू असलेल्या लसीकरण केंद्राची मिळेल. जैन मुनींकडे आधारकार्ड नसते, त्यांचे तसेच बेघर असलेल्यांचे लसीकरण करण्यासाठी अशा घटकांची नोंदणी करण्यात येणार आहे. स्थलांतरित कामगारांच्या माहितीतून त्यांचे लसीकरण केले जाईल. लसीकरणापासून नागरिक वंचित राहिले, तर कोरोनामध्ये पुन्हा वाढ होईल.