कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी अंतर्गत भेदभाव विसरून सामूहिक प्रयत्न आवश्यक ! – मोहन भागवत, सरसंघचालक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नवी देहली येथील ‘कोविड रिस्पॉन्स टीम’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘आम्ही जिंकणार’ या व्याख्यानमालेत १५ मे या दिवशी ‘ऑनलाईन’ मार्गदर्शनात त्यांनी वरील आवाहन केले.

मंत्रांप्रमाणे बायबल आणि कुराण यांचाही प्रयोग करा, असे ते म्हणाले, तर आश्‍चर्य वाटायला नको !

केंद्रीय विज्ञान मंत्रालयाने गायत्री मंत्राने कोरोना बरा होऊ शकतो का ? यावर संशोधन करण्यासाठी ऋषिकेश येथील एम्स रुग्णालयाला ३ लाख रुपयांंचा निधी दिला आहे.   

मुंबईसह पुण्यात कोरोना नियंत्रणात !

मुंबईसह पुण्यामध्ये १८ एप्रिलपासून नव्या रुग्णसंख्येत होणारी घट कायम आहे. मुंबईत १४ मे या दिवशी १ सहस्र ६५७ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे, तर बरे झालेल्या २ सहस्र ५७२ रुग्णांना घरी सोडण्यात आले.

अकोला येथे जात पंचायतीने महिलेला थुंकी चाटण्याची शिक्षा दिल्याप्रकरणी १० पंचांच्या विरोधात गुन्हा नोंद !

जात पंचायतीवर विश्‍वास नसल्याने महिलेने न्यायालयाची पायरी चढून निकाल प्राप्त केला. त्यामुळे जात पंचायतीने महिलेला विकृत शिक्षा देण्याऐवजी स्वतःच्या कार्यप्रणालीत सुधारणा करावी, तसेच असा विकृत प्रकार करणार्‍यांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी !

कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची नोंदणी रात्री ९ नंतर होणार !

१८ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाची नोंदणी सत्रे रात्री ९ नंतर चालू होत असून भ्रमणसंगणकावरून ऑनलाईन नोंदणी केल्यास सत्रे लवकर आरक्षण करता येतील, असे मुंबई पालिकेने स्पष्ट केले आहे. सत्रे खुली झाली, तरी काही क्षणातच आरक्षण पूर्ण होत असल्याने नागरिक नाखूष आहेत.

नागपूर खंडपिठाच्या आदेशानुसार ३ कारागृह अधीक्षकांविरुद्ध खंडणीचा गुन्हा नोंद !

बंदीवानांकडून खंडणी घेणारे कारागृह अधीक्षक पोलीसदलात काम करण्याच्या पात्रतेचे नाहीत, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ? अशा घटनांमुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्‍वास उडत चालला आहे !

ढोंगी धर्मनिरपेक्ष काँग्रेसचे लांगूलचालन चालूच !

ईदच्या निमिताने पंजाबमधील काँग्रेस सरकारने राज्यातील मलेरकोटला हा मुसलमानबहुल भाग स्वतंत्र जिल्हा म्हणून घोषित केला आहे. या जिल्ह्यात मुसलमानांची लोकसंख्या ९० टक्के आहे.

रुग्णालयांमधील दुर्घटना आणि मानवी जिवांचे मूल्य !

गेल्या ४ मासांत महाराष्ट्रातील रुग्णालयांमध्ये ४ दुर्घटना घडल्या. यात अनुमाने ६० रुग्णांचा मृत्यू झाला. ३ घटना आगीमुळे घडल्या, तर एक घटना ऑक्सिजनच्या गळतीमुळे घडली. चारही घटना अत्यंत दुर्दैवी होत्या. कुठेही आग किंवा अपघात झाल्यावर जो गदारोळ होतो तो येथेही झाला.

निधन वार्ता

संकेश्‍वर येथील सनातनच्या साधिका सौ. सुजाता अशोक मोकाशी (वय ४७ वर्षे) यांचे १४ मे या दिवशी कोरोनाबाधित असल्याने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पती, २ मुली असा परिवार आहे. सनातन परिवार मोकाशी कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.

‘म्युकरमायकोसिस’ आजारावर नवी मुंबई महापालिकेच्या वाशी रुग्णालयात उपचार !

म्युकरमायकोसिस आजाराचे काही रुग्ण नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आढळले असून त्यांची महापालिकेच्या वाशी, नेरूळ आणि ऐरोली येथील सार्वजनिक रुग्णालयांत पडताळणी करण्यात येत आहे.