मुंबई – १८ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाची नोंदणी सत्रे रात्री ९ नंतर चालू होत असून भ्रमणसंगणकावरून ऑनलाईन नोंदणी केल्यास सत्रे लवकर आरक्षण करता येतील, असे मुंबई पालिकेने स्पष्ट केले आहे. सत्रे खुली झाली, तरी काही क्षणातच आरक्षण पूर्ण होत असल्याने नागरिक नाखूष आहेत.
कोरोनाच्या लसीकरणासाठी नोंदणी करून वेळ आरक्षित करणे पालिकेने बंधनकारक केले आहे. प्रथम पालिकेने ‘संध्याकाळी ७ नंतर नोंदणी चालू केली जाईल’, असे घोषित केले. लसीचा साठा अनियमित येत असल्याने उपलब्ध साठ्यावरून कोणती केंद्र चालू करायची, याचा निर्णय घेतला जातो. त्यामुळे आता पालिकेने वेळ पालटून रात्री ९ नंतर नोंदणी चालू करण्याचा निर्णय घेतला आहे. वेळ आरक्षित करण्यात अडचणी येत असल्यास नागरिकांनी भ्रमणसंगणक किंवा मोठ्या स्क्रीनचा वापर करावा, असा सल्ला पालिकेने दिला आहे.