मुंबई – मुंबईसह पुण्यामध्ये १८ एप्रिलपासून नव्या रुग्णसंख्येत होणारी घट कायम आहे. मुंबईत १४ मे या दिवशी १ सहस्र ६५७ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे, तर बरे झालेल्या २ सहस्र ५७२ रुग्णांना घरी सोडण्यात आले. सध्या मुंबईत ३७ सहस्र ६५६ रुग्णांवर उपचार चालू आहेत. आता मुंबईचा डबलिंग रेट १९९ दिवसांवर गेला आहे, तर बरे होण्याचे प्रमाण ९२ टक्क्यांवर गेले आहे. पुणे शहरात १४ मे या दिवशी १ सहस्र ८३६ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. ३ सहस्र ३१८ बरे झालेल्या रुग्णांना घरी सोडण्यात आहे.