महाराष्ट्रात वेळ आल्यावर योग्य कार्यक्रम करू ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

मुंबई – महाविकास आघाडीने शेतकर्‍यांची वीज तोडली, त्याविषयी जनतेमध्ये असंतोष होता. पंढरपुरात आम्हाला विठ्ठलाचा आशीर्वाद मिळाला. हा विजय विठ्ठलाच्या चरणी अर्पण करतो. आज आमची शासनासमवेत लढाई नाही. कोरोनाच्या लढाईत आम्ही शासनासमवेत आहोत. वेळ आल्यावर महाराष्ट्रात योग्य कार्यक्रम करू, अशी सूचना विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. पंढरपूर येथील पोटनिवडणुकीत भाजपला मिळालेला विजय आणि पश्‍चिम बंगालमधील निवडणुकीचा निकाल यावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी वरील विधान केले.