कोरोना लसीकरण आणि चाचणी बंधनकारक केल्यामुळे नगर येथील चाचणी अन् लसीकरण केंद्रावर संबंधितांची गर्दी

प्रतिकात्मक चित्र

नगर, ७ एप्रिल – राज्य सरकारने जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये जी आस्थापने आणि सेवा चालू करण्यासाठी अनुमती दिली आहे, तेथील कर्मचार्‍यांना आर्.टी.पी.सी.आर्. चाचणी आणि लसीकरण करून घेण्याचे बंधन घालण्यात आले आहे. त्यासाठी १० एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर संबंधितांना दंड केला जाणार आहे. ‘ब्रेक दि चेन’नावाने लादण्यात आलेल्या निर्बंधांमध्ये लसीकरण आणि चाचणीच्या सक्तीच्या तरतुदी आहेत. त्यासाठी नगर येथील चाचणी आणि लसीकरण केंद्रावर संबंधितांची गर्दी उसळली असल्याने यंत्रणेवर अतिरिक्त ताण आला असून संसर्गाचा धोकाही वाढला आहे.  (याविषयी प्रशासन काय उपाययोजना करणार ? – संपादक)

नागरिक गर्दी न करण्याच्या नियमाकडे दुर्लक्ष करत आहेत. केंद्रांवरील कर्मचार्‍यांच्या सूचनाही पाळायला कुणी सिद्ध नाही. आधीच या केंद्रांवर अन्य नागरिकांची तपासणी चालू असतांना त्यात ही नवीन भर पडली आहे. सरकारी रुग्णालये, सेवाभावी संस्थांच्या वतीने चालवण्यात येणारी केंद्र येथे अशी गर्दी आहे.