(म्हणे) ‘भगवान अय्यप्पा आणि सर्व देवता माकपच्या समवेत !’ – केरळचे हिंदुद्वेषी मुख्यमंत्री पिनराई विजयन्

शबरीमला मंदिराच्या प्राचीन परंपरेच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात बाजू घेणार्‍या माकप सरकारला देवतांचे आशीर्वाद कधीतरी मिळतील का ? आता निवडणूक जिंकण्यासाठी हिंदूंची मते मिळावीत, यासाठी ‘देव नाही’, असे म्हणणार्‍या नास्तिकतावादी माकपवाल्यांना हिंदूंच्या देवतांची आठवण झाली आहे, हेच यातून लक्षात येते !

मुख्यमंत्री पिनराई विजयन्

थिरूवनंतपूरम् (केरळ) – शबरीमलामधील भगवान अय्यप्पा यांच्यासमवेत सर्व देवी आणि देवता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या समवेत आहेत, असे विधान केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन् यांनी केले आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री ओमान चंडी यांनी विजयन् यांच्या विधानावर म्हटले की, एकही भाविक विजयन् यांच्या विधानावर विश्‍वास ठेवणार नाही.