‘रेमडेसिविर’ इंजेक्शनचे आस्थापनानुसार मूल्य निश्‍चित !

सांगली, ७ एप्रिल – भारत सरकारने ‘रेमडेसिविर’ हे इंजेक्शन कोविड रुग्णांना आपत्कालीन वापरासाठी घेण्यास मान्यता दिली आहे. सध्या कोरोना रुग्ण वाढत असल्यामुळे ‘रेमडेसिविर’ इंजेक्शन रुग्णांना वापरण्याची आवश्यकता निर्माण होत आहे.

रेमडेसिविर इंजेक्शनचे आस्थापनानुसार मूल्य

इंजेक्शनच्या औषधाचे नाव, कंसात आस्थापनाचे नाव आणि मूल्य (एम्.आर्.पी.) दिले आहे. Ciprimi inj. (Cipla Ltd.) – ४ सहस्र रुपये, Jubi-R inj. (Jubiliant pharma) – ४ सहस्र ७०० रुपये, Remewin inj. (Sunpharma) – ३ सहस्र ९६० रुपये, Desrem inj.(Mylon) – ४ सहस्र ८०० रुपये, Covifor inj. (Hetro drugs) – ५ सहस्र ४०० रुपये, Ramdac inj. (Zydus Cadila) – ८९९ रुपये.

इंजेक्शनचे पुरवठादार आणि त्यांचे संपर्क क्रमांक

Zydus Cadila – Ramdac inj. अहमदनगर सोमेश्‍वरजी (९१७२७२६००५), मानव सेठ (९४२२३४३४११), Hetro drugs – Covifor inj. पुणे कुंदन फार्मा अभय शेठ (९८२२५५६२६३), Cipla Ltd. – Ciprimi inj. वडकी पुणे सचिन वाडकर (९६५७५३९५९१), Sunpharma – Remewin inj. नागपूर (९९७५६८१८३९), Mylon – Desrem inj. भोयर (८८०५२५०८२१)