समर्थभक्त माधवराव गाडगीळ मित्र परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीच्या निमित्ताने शिवपंचायतन यज्ञ पार पडला !

समर्थभक्त श्री. माधवराव गाडगीळ मित्र परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीच्या निमित्ताने ब्राह्मणपुरी येथील काशीविश्‍वेश्‍वर देवालय येथे शिवपंचायतन यज्ञ पार पडला.

राज्यातील गडकोटांच्या दुरवस्थेविषयी युवावर्गाने आवाज उठवावा ! – किरण दुसे, हिंदु जनजागृती समिती 

हिंदू समाजाला सातत्याने प्रेरणा देणारे अनेक गड-कोट सध्या दुरवस्थेत आहेत. गडकोटांच्या दुरवस्थेविषयी युवावर्गाने आवाज उठवावा, असे आवाहन श्री. किरण दुसे यांनी केले.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांचे त्यागपत्र

उत्तराखंड राज्याचे भाजप सरकारचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी त्यांच्या पदाचे त्यागपत्र राज्यपाल बेबी राणी मौर्य यांची भेट घेऊन सादर केले. त्यांच्याविषयी पक्षांतर्गत असलेल्या अप्रसन्नतेतून त्यांना पक्षाने त्यागपत्र देण्यास सांगितल्याचे म्हटले जात आहे.

मालेगाव (नाशिक) येथे हिंदु मुलीचे बळजोरीने आणि अवैधरित्या धर्मांतर करून तिचा निकाह लावल्याविषयी तक्रार प्रविष्ट !

हिंदु मुलींवर बळजोरी करणार्‍या धर्मांधांना वेळीच वठणीवर आणण्यासाठी त्यांच्यावर कठोर कारवाईच होणे आवश्यक !

भैसा (तेलंगाणा) येथे धर्मांधांकडून क्षुल्लक कारणावरून दंगल

तेलंगाणामध्ये तेलंगाणा राष्ट्र समितीच्या मुसलमानप्रेमी सरकारच्या राज्यात धर्मांधांचा उद्दामपणा असाच चालू रहाणार यात शंका नाही. बहुसंख्य हिंदूंच्या देशात आणि राज्यांत हिंदूंना अशा प्रकारे मार खावा लागतो, हे त्यांना लज्जास्पद ! ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !

दक्षिण आफ्रिकेमध्ये हिंदु संघटनांकडून जागतिक शांततेसाठी प्रार्थनासभेचे आयोजन

हिंदू सहिष्णु असल्यामुळेच ते अशा प्रकारच्या प्रार्थनासभांचे आयोजन करतात !

भारताने जगाला कोरोनातून वाचवले ! – अमेरिकेच्या ज्येष्ठ वैज्ञानिकांचे गौरवोद्गार

‘एम्.आर्.एन्.ए.’ (अमेरिकेने सर्वप्रथम कोरोनावर काढलेली लस) लसींचा परिणाम जगातील गरिब आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांवर होत नाही; मात्र भारताच्या लसीने जगाला वाचवले आहे.

ब्रिटीश राजघराण्याला जन्माला येणार्‍या माझ्या बाळाच्या काळ्या रंगाची चिंता होती ! – प्रिन्स हॅरीची पत्नी मेगन मार्कल हिचा गौप्यस्फोट

ब्रिटिशांनी भारतावर राज्य करतांना वर्णद्वेषातून भारतियांवर किती अत्याचार केले, याला सीमाच नाही. मेगन मर्केल यांच्या आरोपात तथ्य असेल, तर अशा ब्रिटिश राजघराण्यात स्वतःच्या मुलांविषयी कसा विचार केला जातो, यातून त्यांची मानवताविरोधी मानसिकता अधिक स्ष्ट होते.

पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील अपव्यवहारप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले यांना ‘ईडी’कडून अटक !

शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील अनुमाने ७१ कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या अपव्यवहारप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार अनिल भोसले यांच्यासह चौघांना येरवडा कारागृहातून अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली आहे.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांच्याकडील कार्यभार काढून घेतला

जिल्हा रुग्णालयातील एका महिला कर्मचार्‍याचा विनयभंग केल्याचा आरोप असलेले जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांच्याकडील पदभार काढून घेण्यात आला आहे. हा पदभार अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे.