समर्थभक्त माधवराव गाडगीळ मित्र परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीच्या निमित्ताने शिवपंचायतन यज्ञ पार पडला !

काशीविश्‍वेश्‍वर देवालय येथे शिवपंचायत यज्ञात सहभागी मान्यवर

मिरज – समर्थभक्त श्री. माधवराव गाडगीळ मित्र परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीच्या निमित्ताने ९ मार्च या दिवशी ब्राह्मणपुरी येथील काशीविश्‍वेश्‍वर देवालय येथे शिवपंचायतन यज्ञ पार पडला. या प्रसंगी काशीविश्‍वेश्‍वर देवालयाचे अध्यक्ष श्री. किशोर पटवर्धन, सर्वश्री प्रकाश जोशी, विनोदभाऊ कुलकर्णी, प्रसाद शानबाग, आठवले गुरुजी, परब, मंदार गाडगीळ, श्रेयस गाडगीळ, तेजस गाडगीळ, भूषण गाडगीळ, सौ. मुग्धा गाडगीळ यांसह भाविक उपस्थित होते.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अन्य कार्यक्रम रहित करण्यात आले असून १० आणि ११ मार्च या दोन्ही दिवशी सायंकाळी ७ वाजता ह.भ.प. सौ. सुचेता हसबनीस यांचे कीर्तन वेणास्वामी मठाच्या समर्थ प्रबोधिनी या फेसबूक पेजवरून लाईव्ह करण्यात येणार आहे. तरी अधिकाधिक भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. माधवराव गाडगीळ यांनी केले आहे.