राज्यातील गडकोटांच्या दुरवस्थेविषयी युवावर्गाने आवाज उठवावा ! – किरण दुसे, हिंदु जनजागृती समिती 

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमापूजन प्रसंगी डावीकडून श्री. योगेश कावळे, श्री. रामभाऊ मेथे, श्री. किरण दुसे आणि श्री. सूरज किडगांवकर

कोल्हापूर – हिंदू समाजाला सातत्याने प्रेरणा देणारे अनेक गड-कोट सध्या दुरवस्थेत आहेत. अनेक गडांवर धर्मांधांची अतिक्रमणे झाली आहेत, अनेक गडांवर वीरांच्या समाधी, तसेच तेथील देवतांची मंदिरे भग्न अवस्थेत आहेत. पुरातत्व विभाग केवळ नियमांवर बोट ठेवून त्या संदर्भात डोळेझाक करत आहे. काही संघटना या संदर्भात स्वत:हून पुढाकार घेऊन ही स्थिती पालटण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्याप्रमाणे राज्यातील गडकोटांच्या दुरवस्थेविषयी युवावर्गाने आवाज उठवावा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांनी केले. ते वारणा येथील श्री हनुमान मंदिर या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात बोलत होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. धर्मप्रेमी श्री. रामभाऊ मेथे यांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचा परिचय करून दिला. या वेळी शिवशंभू संघटनेचे पन्हाळा तालुकाध्यक्ष श्री. योगेश कावळे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. सूरज किडगांवकर यांसह अन्य शिवप्रेमी उपस्थित होते.

विशेष

१. कार्यक्रमात श्री. किरण दुसे आणि श्री. रामभाऊ मेथे यांच्या हस्ते धर्मवीर छत्रपती श्री संभाजीमहाराज बलीदान मासाची पत्रके शिवकन्या आणि उपस्थित धर्मप्रेमींना देण्यात आली.

२. या वेळी श्री. योगेश कावळे म्हणाले, आजपर्यंत आमच्या कार्याची व्याप्ती मर्यादित होती. श्री. किरण दुसे यांचे हिंदु जनजागृती समितीच्या माध्यमातून चालू असलेले राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य ऐकल्यावर हिंदु जनजागृती समितीने यापुढेही आम्हाला नियमित दिशादर्शन करावे.