|
तेलंगाणामध्ये तेलंगाणा राष्ट्र समितीच्या मुसलमानप्रेमी सरकारच्या राज्यात धर्मांधांचा उद्दामपणा असाच चालू रहाणार यात शंका नाही. बहुसंख्य हिंदूंच्या देशात आणि राज्यांत हिंदूंना अशा प्रकारे मार खावा लागतो, हे त्यांना लज्जास्पद ! ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !

भाग्यनगर (तेलंगाणा) – राज्यातील भैसा येथे धर्मांधांनी केलेल्या दंगलीमध्ये १० हून अधिक जण घायाळ झाले, तर अनेक घरे आणि वाहने यांना आग लावण्यात आली. घायाळांपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. ही दंगल एका मशिदीजवळ चालू झाली. पोलिसांना याची माहिती मिळाल्यावर त्यांनी काही काळामध्ये त्यावर नियंत्रण मिळवले. येथे जमावबंदी लागू केली आहे. गेल्या वर्षीही येथे दंगल झाली होती.
पोलिसांनी सांगितले की, दुचाकीवरील दोघांच्या वादातून येथे धर्मांधांकडून दगडफेक झाली. यानंतर जाळपोळ झाली. या वेळी पत्रकारांवरही आक्रमणे करण्यात आली. याविषयी केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी पोलीस महासंचालकांशी संपर्क करून आरोपींना तात्काळ अटक करण्याचा आदेश दिला.
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
प्रवाशाला लुटणार्या दोघांना सुनावली पोलीस कोठडी
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !