भारताने जगाला कोरोनातून वाचवले ! – अमेरिकेच्या ज्येष्ठ वैज्ञानिकांचे गौरवोद्गार

ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. पीटर होटेज

ह्युस्टन (अमेरिका) – ‘एम्.आर्.एन्.ए.’ (अमेरिकेने सर्वप्रथम कोरोनावर काढलेली लस) लसींचा परिणाम जगातील गरिब आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांवर होत नाही; मात्र भारताच्या लसीने जगाला वाचवले आहे. या योगदानाला न्यून समजता कामा नये, अशा शब्दांत अमेरिकेतील ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. पीटर होटेज यांनी भारताचे कौतुक केले आहे. होटेज हे ह्यूस्टन येथे ‘बायलोर कॉलेज ऑफ मेडिसीन’मधील ‘नॅशनल स्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडिसीन’चे अधिष्ठाता आहेत. ‘कोविड-१९ : व्हॅक्सिनेशन अँड पोटेंशियल रिटर्न टू नॉर्मन्सी – इफ एंड व्हेन’ या वेबिनारमध्ये ते बोलत होते. ‘भारताने विकसित केलेली लस जगाला भारताकडून मिळालेली भेट आहे’, असेही ते म्हणाले.

होटेज म्हणाले की, औषधनिर्मिती क्षेत्रातील व्यापक अनुभव, तसेच ज्ञान यामुळे भारताला कोरोना साथीच्या काळात ‘फार्मसी ऑफ द वर्ल्ड’ असे म्हटले गेले. भारत जगातील सर्वांत मोठा औषधनिर्माता देश असून कोरोनाची लस विकत घेण्यासाठी मोठ्या संख्येने विविध देशांनी भारताला संपर्क साधला आहे. भारताने विविध देशांना भेट म्हणून लसीचे डोसही पाठवले आहेत.