पुणे येथे हॉटेलच्या वेटरकडून ग्राहकाची आर्थिक फसवणूक
पिंपरी-चिंचवडच्या लांडेवाडी चौकातील मधुबन बार अँड रेस्टराँमध्ये जेवण्यासाठी आलेल्या ग्राहकांच्या डेबिट कार्डचे क्लोनिंग करून त्यातून ९४ सहस्र ५०० रुपये काढून आर्थिक फसवणूक करण्यात आली.
पिंपरी-चिंचवडच्या लांडेवाडी चौकातील मधुबन बार अँड रेस्टराँमध्ये जेवण्यासाठी आलेल्या ग्राहकांच्या डेबिट कार्डचे क्लोनिंग करून त्यातून ९४ सहस्र ५०० रुपये काढून आर्थिक फसवणूक करण्यात आली.
कोल्हापुरातील प्रसिद्ध फौजदारी वकील दिलीप मुंदरगी (वय ६० वर्षे) यांचे ७ जानेवारी या दिवशी अल्पशा आजाराने निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून किडनीच्या आजाराने ते त्रस्त होते.
राज्यातील सर्वच विभागीय सहसंचालक कार्यालयातील कामकाजाचा आढावा घेण्यासाठी मंत्रालय आपल्या दारी अभियानाचा आरंभ २५ जानेवारी या दिवशी कोल्हापूर येथून करण्याच्या सूचना उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विभागाचे प्रधान सचिव ओ.पी. गुप्ता यांना दिले.
गंगावेस-शिवाजी पूल रस्त्याचे काम हेतूपुरस्सर कासवगतीने करणार्या अधिकार्यांवर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन आखरी रास्ता कृती समितीच्या वतीने कोल्हापूर महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांना देण्यात आले.
वाचनालय लोकप्रतिनिधींच्या अंतर्गत राजकारणामुळे बंद असून नगरपालिकेतील सत्ताधारी गटाच्या काही कार्यकर्त्यांनी आपले स्वतःचे कार्यालय चालू केले आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे तेथे मटका चालू असतो. तरी तेथील अपप्रकार थांबवावेत, या मागणीचे निवेदन तहसीलदारांना दिले आहे.
जगातील बलाढ्य महासत्ता असणार्या अमेरिकेत असे घडते, हे लज्जास्पद ! इतर वेळी लोकशाही, मानवाधिकार आदी सूत्रांवरून भारताला सुनवणार्या अमेरिकेने स्वतःच्या देशातील नागरिकांमध्ये लोकशाहीची मूल्ये रूजवणे किती आवश्यक आहे, हे यातून दिसून येते !
न्यायालयाला अशी चिंता व्यक्त करावी लागते, याला पोलीस, प्रशासन आणि शेतकरी उत्तरदायी आहेत ! सामान्य लोकांकडून दंड वसूल करणारे प्रशासन आणि पोलीस येथे गांधी यांच्या माकडांप्रमाणे कृती करत आहेत, तसेच नियम भंग करणारे शेतकरीही जनताविरोधी कृती करत आहेत !
चीननेदेखील नेपाळला लस पुरवठा करण्याचे आश्वासन दिले आहे; मात्र चीनपेक्षा भारतावर अधिक विश्वास व्यक्त करून नेपाळ चीनला धक्का देण्याच्या सिद्धतेत असल्याचे म्हटले जात आहे !
काठमांडू, पोखरा, बुटवल, इटहरी, धरान, भैरहवा, विराटनगर, बीरगंज आदी भागांमध्ये ही आंदोलने चालू आहेत. नेपाळमध्ये हिंदु राष्ट्राची पूर्वी स्थापना करणारे पृथ्वी नारायण शहा यांचे चित्र घेऊन लोक रस्त्यावर निदर्शने करत आहेत.