कोल्हापूर – कोल्हापुरातील प्रसिद्ध फौजदारी वकील दिलीप मुंदरगी (वय ६० वर्षे) यांचे ७ जानेवारी या दिवशी अल्पशा आजाराने निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून किडनीच्या आजाराने ते त्रस्त होते. जुन्या काळातील फौजदारी वकील प्रफुल्लचंद्र मुंडरगी यांचे ते चिरंजीव होते. त्यांनी गेली ३५ वर्षे कोल्हापुरात वकिली क्षेत्रात काम केले. मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापुरात खंडपीठ व्हावे, या आंदोलनातही त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, भाऊ असा परिवार आहे. बेळगाव येथील सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीचे हितचिंतक अधिवक्ता शरदचंद्र मुंदरगी यांचे ते चुलतभाऊ होत.