हिंदूंच्या मोठ्या मंदिरांच्या जवळ ख्रिस्ती मिशनरी धर्मांतराला उत्तेजन देतात ! – चंद्रबाबू नायडू, अध्यक्ष, तेलुगु देसम्  

हिंदूंच्या मंदिरांच्या ठिकाणी ख्रिस्ती मिशनर्‍यांचा सुळसुळाट झाला आहे, ही वस्तूस्थिती आहे; मात्र ख्रिस्ती नेते मिशनर्‍यांना त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहेत, हे लक्षात घ्या !

(म्हणे) ‘१५ वर्षांची मुलगीही आई होऊ शकते, तर विवाहाचे वय वाढवण्याची आवश्यकता काय ?’ – काँग्रेसचे नेते सज्जनसिंह वर्मा यांचे विधान !

‘मुली केवळ मुले जन्माला घालण्यासाठी असतात’, असे काँग्रेसवाल्यांना वाटते’ ! अशा संकुचित विचारांच्या काँग्रेसवाल्यांना जनतेने जाब विचारला पाहिजे !

श्रीरामंदिरासाठी अर्पण गोळा करणार्‍या भाजप कार्यकर्त्यांवर विकले गेलेले मुसलमान दगडफेक करतील आणि त्याचा भाजप राजकीय लाभ उठवेल !

असा दावा करून हसन दगडफेक करणार्‍या धर्मांधांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, हे न समजण्याइतकी जनता दूधखुळी नाही !

रामसेतूच्या संशोधनाला पुरातत्व विभागाची संमती !

इतकी वर्षे पुरातत्व विभागाच्या हे लक्षात का आले नाही ? हिंदूंची ऐतिहासिक आणि पुरातन मंदिरे अन् वास्तू यांविषयी पुरातत्व विभाग नेहमीच निष्काळजी राहिला आहे. रामसेतूच्या संदर्भातही हेच दिसून येते !

भोपाळमध्ये काँग्रेसकडून घरोघर जाऊन श्रीराममंदिरासाठी थेट बँक खात्यात पैसे जमा करण्याचे आवाहन !

काँग्रेसचे हे श्रीराममंदिराविषयीचे प्रेम म्हणजे ढोंग आहे, हे न कळण्याइतके हिंदू दूधखुळे नाहीत. काँग्रेसला खरेच श्रीराममंदिराविषयी काही करायचे असते, तर पक्षाने संपूर्ण देशात असे अभियान राबवले असते !

पक्षातील सहकार्‍यांना विश्‍वासात घेऊन मुंडे यांच्याविषयी निर्णय घेऊ ! – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

धनंजय मुंडे यांनी एका महिलेवर अत्याचार केल्याचे आरोप गंभीर आहेत.-शरद पवार

राज्यातील ३५८ केंद्रांच्या माध्यमातून ३५ सहस्र आरोग्य कर्मचार्‍यांना लसीकरण करण्यात येणार ! – आरोग्यमंत्री राजेश टोपे

राज्यात कोरोना लसीकरणासाठी केंद्र शासनाकडून लसींचा पुरवठा करण्यात आला असून त्यांच्या निर्देशनुसार सर्व जिल्ह्यांना लसींचे वाटप केले जात आहे.

राज्यपाल आणि आचार्य स्वामी अवधेशानंद गिरी महाराज यांच्या उपस्थितीत श्रीराम जन्मभूमी मंदिर निधी समर्पण अभियानाचा शुभारंभ !

अयोध्येतील श्रीराम जन्मभूमीवर मंदिर उभारणीसाठी संपूर्ण देशात १५ जानेवारीपासून निधी संकलन मोहीम आखण्यात आली आहे.

पुणे येथील डॉक्टर महिलेकडे ५ लाख रुपयांची खंडणी मागणार्‍या खंडणीखोराला अटक 

अशाप्रकारे धमकी दिली जाण्यास गुन्हेगार धजावतात यावरून त्यांना कायद्याचा धाक नसल्याचे लक्षात येते. असा धाक निर्माण होण्यासाठी गुन्हेगारांना त्वरित कठोर शिक्षा होऊन त्याची कार्यवाही करणे आवश्यक आहे.

बलात्काराची लेखी तक्रार केल्यावर गुन्हा नोंदवणे बंधनकारक असतांना पोलिसांकडून कारवाई नाही

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात एका महिलेने बलात्काराची लेखी तक्रार करूनही पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही.