भोपाळमध्ये काँग्रेसकडून घरोघर जाऊन श्रीराममंदिरासाठी थेट बँक खात्यात पैसे जमा करण्याचे आवाहन !

  • काँग्रेसवाले उद्या सर्वधर्मसमभाव जपण्यासाठी अयोध्येत बांधण्यात येणार्‍या मशिदीसाठीही पैसे अर्पण करण्यासाठी आवाहन करतील !
  • काँग्रेसचे हे श्रीराममंदिराविषयीचे प्रेम म्हणजे ढोंग आहे, हे न कळण्याइतके हिंदू दूधखुळे नाहीत. काँग्रेसला खरेच श्रीराममंदिराविषयी काही करायचे असते, तर पक्षाने संपूर्ण देशात असे अभियान राबवले असते !
श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने दिलेल्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा करा – काँग्रेसचे आवाहन

भोपाळ (मध्यप्रदेश) – श्रीराममंदिरासाठी विश्‍व हिंदु परिषदेकडून लोकांकडून थेट अर्पण करण्याचे अभियान राबवण्यात येत असतांना येथे काँग्रेसने  नागरिकांकडून अर्पण गोळा करण्यासाठी लोकांच्या घरी जाण्यास प्रारंभ केला आहे. माजी मंत्री पी.सी. शर्मा यांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी येथील न्यू मार्केटमधील श्री हनुमान मंदिरात पूजा करून या अभियानाला प्रारंभ केला. काँग्रेस कार्यकर्ते लोकांना थेट पैसे न घेता श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने दिलेल्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा करण्यास सांगत आहेत. ‘अन्य कुणालाही रोख रकमेत पैसे देऊ नयेत’, असेही आवाहन त्यांनी केले.

(सौजन्य : ANI News)

१. पी.सी. शर्मा म्हणाले की, यापूर्वीही राममंदिरासाठी काही लोकांनी धन गोळा केले; मात्र त्याचा हिशोब त्यांनी दिलेला नाही; म्हणून आम्हीही पैसे गोळा करत नसून लोकांना बँकेत जमा करण्यास सांगत आहोत.

(चित्रावर क्लिक करा)

२. काँग्रेस कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, राममंदिर उभारणे हे राजीव गांधी यांचे स्वप्न होते. त्यांनीच वर्ष १९८६ मध्ये श्रीरामजन्मभूमीवरील मंदिराचे टाळे उघडण्याचा आदेश दिला होता. (असे आहे, तर राजीव गांधी यांच्यानंतर काँग्रेसला श्रीराममंदिर बांधण्यासाठी कुणी रोखले होते ? याचे उत्तर ते का देत नाहीत ? – संपादक)