मंत्री नवाब मलिक यांच्या जावयांना अटक

अमली पदार्थ नियंत्रक विभागाने (एन्.सी.बी.) अमली पदार्थ विक्री आणि दलाली या प्रकरणी १३ जानेवारी या दिवशी समीर खान यांना अटक केली आहे. समीर खान हे राज्याचे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांचे जावई आहेत.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या धर्मांधाला अटक

अंधारात लपून बसलेल्या धर्मांधाने अल्पवयीन मुलीला जवळील टेम्पोत नेऊन तिच्यावर बलात्कार केला.

मुंडेंवर आरोप करणार्‍या महिलेकडून भाजप नेत्याला ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकवण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा

मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर ज्या महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे, तिने मला ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी केला आहे.

धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध निवडणूक आयोगाकडे तक्रार

बलात्कार आणि लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप झालेले राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.

नागपूर येथे नायलॉन मांजाने गळा कापल्याने तरुणाचा मृत्यू

नायलॉन मांजा वापरणारे यांवर महापालिका प्रशासनाने कठोर कारवाई करणे आवश्यक आहे !

चार हुतात्मा पुतळ्यांची दुरवस्था झाल्याप्रकरणी संभाजी आरमारचा महापालिकेत ठिय्या

हुतात्म्यांच्या पुतळ्यांच्या दुरवस्थेकडे महापालिकेचे लक्ष नाही, असा याचा होतो. संबंधितांवर कारवाई होणे अपेक्षित !

सनातनचे पनवेल येथील साधक डॉ. दीपक जोशी ʻकोरोना योद्धाʼ पुरस्काराने सन्मानित

जगात हाहा:कार माजवणाऱ्या कोरोना महामारीच्या विरोधात समाजातील अनेक घटकांनी नि:स्वार्थपणे सेवा बजावली. या पार्श्वभूमीवर बेंगळुरू येथील ʻस्मृती साधनाʼ नावाच्या स्वयंसेवी संस्थेने अशा लोकांना ʻकोरोना योद्धाʼ पुरस्कार देऊन गौरविले आहे.

खोट्या इतिहासाचे सत्य !

शिक्षणक्षेत्रात पालट करण्यासाठी धर्माधिष्ठित राज्यव्यवस्था आणावी लागेल. मुळात अशा राज्यव्यवस्थेमध्ये केवळ शिक्षणव्यवस्थाच नाही, तर संपूर्ण आमूलाग्र पालट करण्याची शक्ती असणार आहे. त्यात शिक्षणक्षेत्रासह अर्थ, संरक्षण, प्रशासन, न्यायपालिका, पोलीस आदी सर्वच क्षेत्रांत रामराज्याप्रमाणे स्थिती निर्माण करण्यासाठी पालट केले जातील.

कोरोना महामारीच्या काळात दळणवळण बंदीमुळे वर्ष २०२० मध्ये गोव्यात महिलांच्या विरोधातील अत्याचारांत वाढ !

अल्पवयीन मुलींवरील बलात्काराच्या या प्रकरणांमध्ये अल्पवयीन मुली त्यांचा मित्र म्हणून समजला जाणारा अल्पवयीन मुलगा किंवा पुरुष यांच्याकडून बलात्काराची शिकार होत आहेत. यावरून समाजाने साधना करणे किती आवश्यक आहे, ते लक्षात येते !

जिल्ह्यासाठी कोरोना लसीचे १० सहस्र ६६० डोस उपलब्ध !

कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा शुभारंभ १६ जानेवारी दिवशी होणार आहे. या लसीकरण मोहिमेसाठी जिल्ह्याला लसीचे १० सहस्र ६६० डोस उपलब्ध झाले आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालय, ओरोस येथे लसीकरण मोहिमेचा शुभारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.