कोल्हापूर शहराची हद्दवाढ करण्यासाठी सर्वतोपरी साहाय्य करू ! – एकनाथ शिंदे, नगरविकासमंत्री 

कोल्हापूर शहराची हद्दवाढ करण्यासाठी सर्वतोपरी साहाय्य करू. यासाठी सरकारकडे फेरप्रस्ताव सादर करा, अशा सूचना नगरविकासमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी महापालिका प्रशासनाला केल्या.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने सरसेनापती धनाजीराव जाधव यांच्या समाधीची नित्यपूजा 

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्याकडून १ जानेवारीपासून प्रतिदिन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकाळातील सैन्यदलातील सरसेनापती धनाजीराव जाधव यांच्या पेठवडगाव येथील समाधीची नित्यपूजा करण्यात येत आहे.

हिंदूंनी धर्माचरण करून धर्महानी रोखण्यासाठी सिद्ध व्हावे ! – आधुनिक वैद्य श्रीपाद पेठकर, हिंदु जनजागृती समिती 

ईश्‍वरी कार्यात राष्ट्र आणि धर्म यांवर होणार्‍या आघातांच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी हिंदूंनी धर्माचरण करून धर्महानी रोखण्यासाठी सिद्ध व्हावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे आधुनिक वैद्य श्रीपाद पेठकर यांनी केले.

आणे (जिल्हा सातारा) येथील थकबाकीदारांची नावे फलकावर 

कराड तालुक्यातील आणे ग्रामपंचायतीच्या वतीने थकबाकीदारांची नावे फलकावर (‘फ्लेक्स बोर्ड’वर) प्रसिद्ध करण्यात आली आहेत. यामध्ये गावातील ग्रामपंचायतीचे आजी-माजी पदाधिकारी, सदस्य आणि इतर समित्यांमधील आजी-माजी सदस्य यांच्या नावांचा समावेश आहे.

अधिक परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना फसवणारा कह्यात !

गुंतवणूकदारांनी गुंतवलेल्या रकमेवर १८ ते २४ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणार्‍या व्यक्तीस आर्थिक गुन्हे शाखेने कह्यात घेतले आहे.

द्रुतगती मार्गावर सीसीटीव्ही छायाचित्रक बसवण्याची योजना व्यवहार्य नसल्याचे कारण देत गुंडाळली !

सीसीटीव्ही छायाचित्रक बसवण्याची योजना अव्यवहार्य असल्याचे कारण देत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून ही योजना गुंडाळण्यात आली आहे. याविषयी महामंडळाचे पुणे विभागाचे अधीक्षक अभियंता आ.पं. नागरगोजे यांनी सांगितले.

सातारा येथे भुयारी रस्त्यावरील नामफलक फाडल्याने तणाव

८ जानेवारी या दिवशी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी भुयारी रस्ता (ग्रेड सेपरेटर) खुला करत असल्याचे जाहीर केले. मात्र ९ जानेवारीच्या पहाटे नामफलक फाडल्याचे समोर आल्यानंतर तणाव निर्माण झाला आहे.

कर्नाटकमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणार्‍या स्वजातीतील पुजार्‍याशी विवाह करणार्‍या ब्राह्मण वधूला मिळणार ३ लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य

‘आता धर्मनिरपेक्षता जपण्यासाठी मुसलमान महिलांनाही अशा प्रकारचे साहाय्य द्यावे’, अशी मागणी तथाकथित निधर्मी राजकीय पक्ष, संघटनांनी केल्यास आश्‍चर्य वाटू नये !

‘अ‍ॅमेझॉन’च्या ‘तांडव’ वेब सिरीजमधून हिंदूंचे नकारात्मक चित्रण

हिंदूंना भ्रष्ट आणि गुंड, तर मुसलमानाला दाखवले चांगले ! ‘अ‍ॅमेझॉन’कडून सातत्याने होणारा हिंदुद्वेष रोखण्यासाठी केंद्र सरकारने आतातरी त्याच्यावर बंदी घालावी आणि हिंदुद्वेष कायमचा थांबवावा !