श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने सरसेनापती धनाजीराव जाधव यांच्या समाधीची नित्यपूजा 

सरसेनापती धनाजीराव जाधव यांच्या समाधीच्या नित्यपूजेसाठी उपस्थित धारकरी

पेठवडगाव (जिल्हा कोल्हापूर) – श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्याकडून १ जानेवारीपासून प्रतिदिन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकाळातील सैन्यदलातील सरसेनापती धनाजीराव जाधव यांच्या पेठवडगाव येथील समाधीची नित्यपूजा करण्यात येत आहे.

श्रीशिवछत्रपतींचे पूजा केलेले अश्‍वारूढ स्मारक

प्रतिदिन समाधीचा परिसर स्वच्छ करून, पूजा करून, फुले अर्पण करण्यात येतात. समाधीच्या पूजेचे दिनांकानुसार नियोजन करण्यात आले असून वडगाव, पन्हाळा विभागातील एकेका गावाला पूजेचा मान दिला जाणार आहे. ७ जानेवारी या दिवशी वारणानगर येथील श्री शिवछत्रपतींच्या अश्‍वारूढ स्मारकाचेही पूजन करण्यात आले.