ही सरकारची कार्यक्षमता आहे कि भ्रष्टाचार ?

‘डॉ. दाभोलकर यांच्यानंतर अंनिसच्या ट्रस्टचे काम आणि व्यवहार यांच्याविषयी माहिती घेण्याची प्रक्रिया दीड वर्ष करावी लागली.

पडवणे डोंगरावर भीषण आग

तालुक्यातील पडवणे डोंगरावर सहस्रो एकर परिसर आगीत बेचिराख झाला. या डोंगरावर आंब्याच्या बागा असल्याने मोठी हानी झाली असण्याची शक्यता आहे, तसेच शेतमांगरही जळून गेले आहेत. या घटनेची भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी पहाणी केली.

वीज खात्यातील ३२ ‘डाटा एन्ट्री ऑपरेटर्स’ची नियुक्ती न्यायालयाकडून रहित

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने वीज खात्यातील ३२ ‘डाटा एन्ट्री ऑपरेटर्स’ची नियुक्ती रहित केली आहे. अंतिम उमेदवारी सूची सिद्ध करतांना नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका न्यायालयाने ठेवला आहे. ३२ ‘डाटा एन्ट्री ऑपरेटर्स’ची ही नियुक्ती वर्ष २०१६ मध्ये करण्यात आली होती.

देहलीतील पोलीस केंद्र सरकारच्या अखत्यारित असतांना अशा प्रकारच्या घटना घडणे लज्जास्पद !

देहली येथील कैलाश विहार पंसारी भागात शिवशक्ती मंदिरामध्ये तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे.

पाकच्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा अधिकारी हुतात्मा

सीमा सुरक्षा दलातील एक उपनिरीक्षक पाओतिंसत गुइते हुतात्मा , पाकला नष्ट केल्याविना या घटना थांबणार नाहीत !

अंतर्गत प्रकरणांत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करू नका ! – भारताची कॅनडाच्या पंतप्रधानांना समज

कॅनडामध्ये मोठ्या संख्येने शीख धर्मीय रहातात आणि देहली येथे आंदोलन करणारे शेतकरी मोठ्या संख्येने शीख असल्याने ट्रुडो यांनी मतांच्या लांगूलचालनासाठीच या आंदोलनावर भाष्य केल्याचे लक्षात येते !

पोलीस निरीक्षक सागर एकोस्कर यांनी होंडा येथील स्थानिक नेत्याला मारहाण केल्याने तणाव

खनिज मालाच्या वाहतुकीवरून आंदोलन करणारे स्थानिक नेते तथा होंडा (सत्तरी) पंचायतीचे माजी सरपंच आणि विद्यमान पंचसदस्य सुरेश माडकर यांना वाळपई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर एकोस्कर यांनी मारहाण केल्याच्या आरोपावरून होंडा येथे २ डिसेंबर या दिवशी सकाळी तणावाचे वातावरण निर्माण झाले.

जिल्हा पंचायत निवडणूक प्रक्रिया नव्याने चालू करण्यासाठी न्यायालयात याचिका प्रविष्ट

राज्यात होऊ घातलेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीची प्रक्रिया नव्याने चालू करण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठात प्रविष्ट करण्यात आली आहे.

मंत्रीमंडळात फेरपालट होणार नसून मंत्री लोबो यांनी याविषयी चर्चा केलेली नाही ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

गोव्याच्या मंत्रीमंडळात फेरपालट करण्यात येणार नाही, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. मंत्रीमंडळातील ज्येष्ठ मंत्री मायकल लोबो यांनी जिल्हा पंचायत निवडणुकीनंतर मंत्रीमंडळात फेरपालट करणार असल्याचे सांगितले होते.

बेशिस्त भारतियांना लज्जास्पद !

जे लोक कोरोना नियमांचा भंग करत आहेत, त्यांना न्यूनतम ५ ते १५ दिवसांसाठी कोणत्याही कोविड सेंटरमध्ये सेवा बजावण्याची शिक्षा करण्यात यावी, असा आदेश गुजरात उच्च न्यायालयाने गुजरात सरकारला दिला आहे.