बांदा तपासणी नाक्यावर पावणे चार लाख रुपयांचे अवैध मद्य पोलिसांच्या कह्यात

गोव्याहून नियमितपणे महाराष्ट्रात मद्याची अवैध वाहतूक होत असते ! पोलीस त्या वेळी थातुर-मातुर कारवाई करतात आणि सोडून देतात. त्यामुळे वर्षानुवर्षे कारवाई करूनही वाहतूक थांबत नाही ! त्यामुळे अशा कारवाया ‘तू मारल्यासारखे कर, मी रडल्यासारखे करतो’, अशा प्रकारच्या आहेत का, अशी शंका येते !

भारतविरोधी ट्रूडो !

स्वत:च्या देशात मानसिक आजार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, व्यसने, महिलांवरील हिंसा इत्यादी प्रश्‍नांविषयी ट्रूडो यांनी लक्ष दिल्यास कॅनडावासियांना साहाय्याचे ठरले असते; मात्र खलिस्तानवादाचे भूत डोक्यावर बसलेल्या ट्रूडोंना ते कळणार नाही. आता केंद्र सरकारने केवळ उत्तर देऊन नव्हे, तर ट्रूडो यांना खडसावून लगाम घालावा, ही अपेक्षा !

कर्नाटकच्या माजी मंत्र्यांचे अपहरण आणि सुटका  

माजी मंत्री वार्थुर प्रकाश यांचे अपहरण केले होते मात्र दुसर्‍या दिवशी त्यांची सुटका केली. या अपहरणामागील नेमके कारण समजू शकलेले नाही.

देशद्रोह्यांचा बंदोबस्त करा !

शेहलावरही देशद्रोहाचा गुन्हा नोंदवला गेल्यावर सर्व स्तरांतून तिच्या अटकेची मागणी होऊन ही अटक केली गेली नाही. अशाना मोकाट सोडणे, हे देशासाठी घातक आहे. ही देशद्रोही कीड वेळीच रोखायला हवी. तसेच तिच्याप्रमाणे देशासाठी धोकादायक ठरणार्‍या सर्व देशद्रोह्यांना कारागृहात डांबायला हवे, ही देशप्रेमींची अपेक्षा !

कोकण रेल्वेमार्गावर ४ डिसेंबरपासून २ अतीजलद गाड्या धावणार

गाडीचे आरक्षण ९ डिसेंबरपासून चालू होणार आहे. जबलपूर-कोईम्बतूर स्पेशल गाडी ५ ते २६ डिसेंबरपर्यंत या कालावधीत धावणार आहे.

गोव्यात गायींची आयात टप्प्याटप्याने बंद करणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

राज्यातील शेतकर्‍यांच्या उत्पन्नवाढीवरून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली ‘इंडियन कौन्सिल फॉर अ‍ॅग्रिकल्चर रिसर्च’ (इकार) या संस्थेच्या पदाधिकार्‍यांसमवेत एक बैठक झाली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली.

सिंधुदुर्गातील सर्व सत्तास्थानांवर भगवा फडकवा ! – अरुण दूधवडकर, जिल्हा संपर्कप्रमुख, शिवसेना

कणकवली तालुका शिवसेनेच्या माध्यमातून येथील मातोश्री मंगल कार्यालयात दूधवडकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून या अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. या वेळी जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

चीनचे चंद्रयान चंद्रावर यशस्वीरित्या उतरले !

चीनची विस्तारवादी महत्त्वाकांक्षा पहाता उद्या चंद्रावर त्याचा अधिकार असल्याचा दावा चीनने केल्यास आश्‍चर्य वाटू नये !

गोव्यात दिवसभरात ३ कोरोनाबाधितांचा मृत्यू

गोव्यात दिवसभरात ३ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, तर दिवसभरात केलेल्या २ सहस्र ३ चाचण्यांमध्ये ११७ कोरोनाबाधित आढळले आहेत.