मंत्रीमंडळात फेरपालट होणार नसून मंत्री लोबो यांनी याविषयी चर्चा केलेली नाही ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

डॉ. प्रमोद सावंत

पणजी, २ डिसेंबर (वार्ता.) – गोव्याच्या मंत्रीमंडळात फेरपालट करण्यात येणार नाही, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. मंत्रीमंडळातील ज्येष्ठ मंत्री मायकल लोबो यांनी जिल्हा पंचायत निवडणुकीनंतर मंत्रीमंडळात फेरपालट करणार असल्याचे सांगितले होते. या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली. ते पुढे म्हणाले, ‘‘मंत्रीमंडळात पालट करण्याचा निर्णय पक्षपातळीवर घेतला जातो. हा निर्णय ज्येष्ठ मंत्री घेत नसतो. मंत्रीमंडळात फेरपालट करण्याविषयी कोणतीही चर्चा झालेली नाही.’’