शाळा चालू करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा ! – जि.प.चे माजी उपाध्यक्ष रणजित देसाई यांची शिक्षण विभागाकडे मागणी

नववी, दहावी आणि बारावीच्या विद्यार्थीवर्गासाठी २३ नोव्हेंबरपासून शाळा चालू करण्याचा राज्यशासनाचा निर्णय हा आत्मघातकी आहे. त्यामुळे होणार्‍या गंभीर परिणामांचा धोका लक्षात घेता, या निर्णयाचा पुनर्विचार करण्यात यावा, अशी मागणी शिक्षण विभागाकडे केली आहे.

दिशाहीन पत्रकारिता नको !

धर्मांधांची आक्रमणे, देशांतर्गत युद्ध, महिलांवरील अत्याचार यांविरुद्ध मोहीम राबवणे आवश्यक असतांना सध्याची पत्रकारिता जनतेला दिशाहीन करत आहे. देश पारतंत्र्यात असतांना नागरिकांना योग्य दिशा देणार्‍या लोकमान्य टिळकांची पत्रकारिता अभ्यासल्यास वृत्तपत्रांना पत्रकारिता कशी असावी, हे निश्‍चित लक्षात येईल.

मध्यप्रदेशात ३ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करणार्‍याला फाशीची शिक्षा

मध्यप्रदेशातील न्यायालय अवघ्या ५ मासांत अशा प्रकारचा निर्णय देऊ शकते, तर अन्य राज्यांमध्ये बलात्काराच्या खटल्यांना निकाली काढण्यास वेळ का लागतो ?

पाकिस्तानला मूर्ख आणि अशिक्षित आतंकवादी मिळतच रहाणार ! – केंद्रीय राज्यमंत्री व्हि.के. सिंह

पाकिस्तान वर्ष १९९० पासून भारताच्या विरोधात जिहादी आतंकवाद्यांना एकत्र करत आहे. हे काम तो चालूच ठेवणार आहे. थोड्याशा पैशांसाठी सिद्ध होणारे मूर्ख आणि अशिक्षित आतंकवादी पाकला मिळतच रहाणार.

देहलीत प्रदूषण असल्यामुळे सोनिया गांधी आणि राहुल गांधी गोवा भेटीवर

देहली येथे प्रदूषण असल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि त्यांचा पुत्र राहुल गांधी गोव्यात आले आहेत. एका खासगी जेट विमानाने २० नोव्हेंबरला दुपारी ते गोव्यात आले.

‘लेबर गेट’ घोटाळ्याचे भ्रष्टाचारविरोधी पथकाच्या माध्यमातून अन्वेषण करण्यास मुख्यमंत्र्यांची मान्यता

‘इमारत आणि इतर बांधकाम मजूर कल्याण निधी’मध्ये गैरव्यवहार झाल्याच्या प्रकरणी (‘लेबर गेट’ घोटाळा) भ्रष्टाचारविरोधी पथकाच्या माध्यमातून अन्वेषण करण्यास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मान्यता दिली आहे.

श्रीराम सेनेचे प्रमुख तथा प्रखर हिंदुत्वनिष्ठ प्रमोद मुतालिक यांच्या गोवा प्रवेशबंदीत वाढ

श्रीराम सेनेचे प्रमुख तथा प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. प्रमोद मुतालिक यांच्या गोवा प्रवेशबंदीत २ मासांनी वाढ करण्यात आली आहे. दक्षिण गोवा जिल्हाधिकार्‍यांनी दक्षिण गोव्याच्या पोलीस अधीक्षकांच्या अहवालाच्या आधारे १० नोव्हेंबरपासून प्रवेशबंदीत वाढ केली आहे.

काश्मीरमध्ये मारले गेलेले आतंकवादी २६/११ सारखे आक्रमण करण्याच्या सिद्धतेत होते !

आज १२ वर्षांनंतरही आतंकवादी पुन्हा असेच आक्रमण करण्याची सिद्धता करतात, हे पहाता भारताने गेल्या १२ वर्षांत देशातील जिहादी आतंकवाद नष्ट केलेला नाही, त्यासाठी त्याचा निर्माता असलेल्या पाकला नष्ट करण्याचे धाडस भारताने आता दाखवायला हवे !

प्राचीन आणि वैभवशाली हिंदु धर्माची महती

विल ड्युरांट यांचा विश्‍वविख्यात ग्रंथ ‘द स्टोरी ऑफ सिव्हिलायजेशन’ हा अभ्यासा. तो चक्क सांगतोच की, हिंदुस्थान ही युरोपियन वंशाची मातृभूमी आहे आणि सर्व युरोपियन भाषांची जननी ‘संस्कृत’ आहे. लोकशाही, स्वयंशासनाचे तत्त्व युरोपियनांनी भारताच्या पंचायत शासनाकडून मिळवले. – गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

राष्ट्राची उभारणी आध्यात्मिक तत्त्वांवर करा ! – स्वामी श्रील भक्तीवेदांत प्रभुपाद

‘‘कृपा करून आध्यात्मिक विकास करा; कारण हाच खरा विकास होय. कुत्र्या-मांजरासारखे रहात असणार्‍या अमेरिकन-युरोपियन लोकांची नक्कल करू नका.