काश्मीरमध्ये मारले गेलेले आतंकवादी २६/११ सारखे आक्रमण करण्याच्या सिद्धतेत होते !

२६/११ चे आतंकवादी आक्रमण वर्ष २००८ मध्ये झाले. आज १२ वर्षांनंतरही आतंकवादी पुन्हा तशाच प्रकारचे आतंकवादी आक्रमण करण्याची सिद्धता करतात, हे पहाता भारताने गेल्या १२ वर्षांत देशातील जिहादी आतंकवाद नष्ट केलेला नाही, हे स्पष्ट होते. तो नष्ट करण्यासाठी त्याचा निर्माता असलेल्या पाकला नष्ट करण्याचे धाडस भारताने आता दाखवणे आवश्यक आहे !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात उच्चस्तरीय बैठक

नवी देहली – काश्मीरच्या नगरोटा येथे १९ नोव्हेंबर या दिवशी जैश-ए-महंमदच्या ४ आतंकवाद्यांना ठार केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात उच्चस्तरीय बैठक पार पडली.

यात गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, परराष्ट्र सचिव आणि सर्व गुप्तचर यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. जिहादी आतंकवादी २६/११ च्या वर्षपूर्ती दिनानिमित्त मोठे आक्रमण करण्याचे कट रचत होते, असे समोर आले आहे.

भारतीय सैन्यदलप्रमुख मनोज मुकुंद नरवणे या चकमकीविषयी म्हणाले की, नियंत्रणरेषा ओलांडण्याचा प्रयत्न करणारे आतंकवादी जिवंत रहाणार नाहीत.

 (सौजन्य : Republic World)

हा संदेश पाकिस्तान आणि त्याच्या आतंकवाद्यांना अगदी स्पष्ट आहे की, जो कुणी भारतामध्ये घुसखोरी करण्यासाठी नियंत्रणरेषा ओलांडेल, त्याच्यावर कारवाई केली जाईल आणि ते परत जाऊ शकणार नाहीत. (भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्यावर त्याला ठार करण्यात येईल, असे जरी असले, तरी असे आतंकवादी निर्माण होत असतांना त्यांना ठार करण्यासाठी आता भारताने पाकमध्ये घुसून कारवाई करावी, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक)